Tue, Aug 04, 2020 13:06होमपेज › Sports › वगळलेल्या ब्रॉडला अँडरसन म्हणाला 'हीच तर इंग्लंडची ताकद'

वगळलेल्या ब्रॉडला अँडरसन म्हणाला 'हीच तर इंग्लंडची ताकद'

Last Updated: Jul 11 2020 5:48PM
साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संकटाला झुगारून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी पुन्हा क्रिकेट रिस्टार्ट केले. या दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना साऊथहॅम्पटन येथे 8 जुलैपासून सुरु झाला. पण, या सामन्यात इंग्लंडने आपल्या अनुभवी जलदगती गोलांदाज स्टुअर्ट ब्रॉडला अंतिम अकराच्या संघात स्थान दिले नाही. त्यामुळे तो नाराज झाला होता. अखेर त्याचा अनेक वर्षाचा जोडीदार जेम्स अँडरसनने याबाबत समजूत काढली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी याबाबत प्रतिक्रिया दिली. 

Live : इंग्लंडकडून दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात

अँडरसन म्हणाला 'ब्रॉड संघात न घेतल्याने निराश झाला आहे. पण, यावरुन इंग्लंडची गोलंदाजी किती तगडी आहे हे दिसते. स्टुअर्ट संघाबाहेर गेल्याने नाराज आहे हे इंग्लंडच्या दृष्टीने चांगले आहे. तो आता संघात परतण्यासाठी आणि दमदार कामगिरी करुन यशात सामिल होण्यासही आतूर असेल. हे संघासाठी सकारात्मक असेल.'

'त्यामुळे' द्युती चंदला विकावी लागणार गाडी!

इंग्लंडने पहिल्या कसोट सामन्यासाठी जोफ्रा आर्चर, मार्क वूड या दोघांना संघात स्थान दिले आहे. त्यांच्या जोडीला जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्सही असणार आहे. जो रुटच्या अनुपस्थितीत या सामन्यासाठी इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे. दरम्यान, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 204 धावा केल्या आहेत तर वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात 318 धावा करुन इंग्लंडवर 114 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात केल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आहे.