Sun, Jan 24, 2021 20:59साक्षी धोनीला नेहा धुपिया, हार्दिक पांड्याकडून खास अंदाजात शुभेच्छा

Last Updated: Nov 25 2020 1:19AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल २०२० टूर्नामेंट संपल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत टाईम स्पेन्ड करत आहे. 'कॅप्टन कूल' धोनीची पत्नी साक्षी धोनीचा वाढदिवस धोनीने खूपच खास अंदाजात साजरा केला. धोनी आपल्या कुटुंबीयांसोबत सध्या दुबईमध्ये आहे. आयपीएलवेळी साक्षी यूएई आली नव्हती. परंतु, आपला ३२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आपली मुलगी जीवासोबत दुबईला पोहोचली. त्याने इन्स्टाग्रामवर ही स्मरणीय क्षणांची स्टोरी पोस्ट केली आहे. 

साक्षीने हीदेखील माहिती दिली आहे की, तिचा भाऊ कबीरचादेखील वाढदिवस आहे. कबीरदेखील यावेळी धोनी आणि साक्षीसोबत दुबईमध्ये आहे. जीवाच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये कबीरदेखील दिसत आहे.

यावेळी साक्षी धोनीला नेहा धुपिया, हार्दिक पांड्याकडून खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. हार्दिकने साक्षीसोबतचा जुना फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय गायक गुरू रंधावा हा साक्षीचा चांगला मित्र आहे. त्यानेही फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया, फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि वेगवान गोलंदाज दीपक चहरनेदेखील साक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत.  

birthday photo - sakshidhoni.fc insta वरून साभार