Wed, Sep 23, 2020 01:48होमपेज › Sports › ‘जर फायदा असेल तरच विवोसोबतचा करार तोडू’

‘जर फायदा असेल तरच विवोसोबतचा करार तोडू’

Last Updated: Jul 02 2020 6:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चीनी कंपनी विवो सोबतचा करार तोडावा यासाठी अनेक स्तरावरून मागणी होत आहे. मात्र, फायद्याशिवाय करार तोडण्याच्या मूडमध्ये बीसीसीआय दिसत नसल्याचे चित्र आहे. मंडळाच्या अधिका-यांनी याविषयी आपले मत व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, विवोसोबतचा करार तोडून बीसीसीआयला जर फायदा होत असेल तरच आम्ही करार तोडण्याचा विचार करीन. याबाबतचा निर्णय आयपीएलच्या पुढील गव्हर्निंग कैन्सिलच्या बैठकीत होईल. मात्र, अद्याप बैठकीची तारीख ठरलेली नाही. 

अधिक वाचा : ब्रावो! रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू

मोबाइल कंपनी विवो इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ची प्रायोजक आहे. आयपीएलचा विवो कंपनीसोबत पाच वर्षांसाठी करार झाला असून २०२२ ला हा करार संपुष्टात येणार आहे. या करारापोटी बीसीसीआयला दरवर्षी ४४० कोटी रुपये मिळतात. 

अधिक वाचा : आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार

यावर्षी २९ मार्चपासून आयपीएल सुरू होणार होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने अनिश्चितकाळासाठी ही स्पर्धा रद्द केली. बीसीसीआयच्या एका वरीष्ठ अधिका-यांच्या माहितीनुसार, स्पर्धा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच यावेळी विवो कंपनी सोबतच्या करारासंबधीचा आढावा घेतला जाईल. मात्र ही बैठक कधी हे निश्चित झालेले नाही. 

‘बायजू’ कंपनीचीही चीनी कंपनीत भागीदारी 

टीम इंडियाची विद्यमान जर्सी प्रायोजक बायजू कंपनीत चीनी कंपनी टेंन्संटची भागीदारी आहे. बायजूने गेल्या वर्षी बीसीसीआयबरोबर पाच वर्षाचा करार केला होता. या करारा अंतर्गत बीसीसीआयला १०७९ कोटी रुपये मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बायजूसोबताच्या कराबाबतही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : शेतकरी झाला धोनी; सेंद्रिय शेती, टकाटक ट्रॅक्टर आणि बरचं काही!

 "