Sat, Oct 24, 2020 08:08होमपेज › Sports › 'पंचांच्या निर्णयामुळे हारला पंजाब'

'पंचांच्या निर्णयामुळे हारला पंजाब'

Last Updated: Sep 21 2020 11:08AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिल्लीसमोर ठेवलेले ३ धावांचे आव्हान २ चेंडूत पार करुन यंदाच्या हंगामातील पहिला सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना दिल्लीने जिंकला. मात्र, या विजयावर माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंचांच्या निर्णयामुळे पंजाब  हारला असे मत सेहवागने ट्विट करत व्यक्त केले आहे. 

पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा; सेहवागचा उपरोधक टोला

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू क्रिस जॉर्डनचा धावपट्टीवरील फोटो शेअर करत सेहवागने झालेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

''दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील झालेल्या समन्यामधील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,” असे ट्विट सेहवागने केले आहे.

सेहवाग इतका का संतापला?

पंजाब धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकांत क्रिस जॉर्डनने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असे जाहीर केले. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते. त्यामुळेच याच रिप्लेच्या स्क्रीनशॉर्टमधील बॅट क्रिजमध्ये टेकवल्याचा फोटो पोस्ट करत सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. 

 "