Sat, Sep 19, 2020 07:06होमपेज › Sports › चहापानापर्यंत १७ षटकांचा खेळ

चहापानापर्यंत १७ षटकांचा खेळ

Last Updated: Jul 08 2020 9:10PM
साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

जवळपास पाच महिन्यापासून लॉकडाऊन झालेले क्रिकेट आजपासून ( दि. ८ ) पुनःश्च हरीओम म्हणत आहे. कोरोनाच्या संकट अजून पूर्णपणे टळले नसले तरी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी कोरोनला बाजूला सारून कसोटी क्रिकेटचा रनअप पुन्हा सुरु केला. पण, आजपासून रोज बाऊलवर सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने आपली खेळी सुरु केली. ओल्या मैदानामुळे खेळ उशीरा सुरु झाला. त्यांनतर अवघी ३ षटके टाकल्यानंतर पुन्हा पावसाने आपली इनिंग सुरु केल्याने खेळ थांबवण्यात आला होता. पुन्हा खेळास सुरुवात झाली आणि अवघ्या १ षटकाचा खेळ झाल्यानंतर पावसाने पुन्हा खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये धाव घेण्यास भाग पाडले.   

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगच कोरोनाग्रस्त झाले आहे. २०२० वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाने जगभर पाय पसरायला सुरुवात केल्याने एका पाठोपाठ एक देश लॉकडाऊन झाले. पर्यायाने क्रिकेटही मार्चमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन झाले. अनेक महिने फक्त इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि लाईव्ह चॅट करुन वैतागलेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या चाहत्यांना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन धाडसी संघांनी मैदानावरची लाईव्ह अॅक्शन पाहण्याची संधी दिली. 

अन् कोरोनाने बदलले क्रिकेटचे नियम!

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. पण, ही कोरोनाला झुगारुन क्रिकेटने केलेला पुनःश्च हरीओम पावसाला मात्र रुचला नाही. नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पावसामुळे सामन्याची सुरुवात लांबली. पावसाने थोडी उसंत दिल्यानंतर सामन्यास सुरुवात झाली. परंतु दुसऱ्याच षटकात इग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्लीचा गॅब्रियालने त्रिफळा उडवून यजमानांना शून्य धावेवर पहिला धक्का दिला. त्यानंतर अवघे एक षटक टाकले गेले आणि पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. हा व्यत्यय थांबल्यानंतर गॅब्रियालने सामन्याचे चौथे षटक टाकले पण, पुन्हा पावसाने आपली इनिंग सुरु केल्याने खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या ४.१ षटकात १ बाद ३ धावा झाल्या होत्या. सलामीवीर रोरी बर्न्स २ तर जो डेनली १ धावेवर खेळत होते.

पहिले सत्र पावसामुळे बऱ्याच अंशी वाया गेल्यानंतर दुसऱ्या सत्रात जवळपास १५ षटकांचा खेळ झाला. पण, त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. त्यानंतर चहापानाची घोषणा करण्यात आली. चहापानसाठी खेळ थांबला त्यावेळी १७.४ षटकात १ बाद ३५ धावा झाल्या होत्या.

लेफ्टनंट कर्नल पन्नू यांनी अमेरिकेत फडकाविला तिरंगा

दरम्यान, सामना सुरु होण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाने वेस्ट इंडिज क्रिकेटच्या झेंड्यावर ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर असा संदेश लिहीत तो झेंडा आपल्या ड्रेसिंग रुमच्या बाहेर लावला. याद्वारे त्यांनी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या कृष्णवर्णीय लोकांवरील अन्यायाच्या विरोधातील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. 

Live : 

मंद प्रकाशामुळे खेळ थांबला

इंग्लंडच्या १७ षटकात १ बाद ३५ धावा

इंग्लंडच्या ९ षटकात १ बाद १२ धावा

पावसाची उसंत, दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु 

पावसाचा लपंडाव, पहिला सेशन वाया

इंग्लंडला पहिला धक्का, डॉमिनिक सिब्ली शून्यावर बाद  

पावसाचा व्यत्यय सामना उशिरा सुरु 

इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

तब्बल ५ महिन्यांनी क्रिकेट पुन्हा सुरु 

 

 "