Thu, Dec 03, 2020 06:08होमपेज › Sports › विराटनंतरची रोहितची जागा राहुल घेणार

विराटनंतरची रोहितची जागा राहुल घेणार

Last Updated: Oct 26 2020 10:05PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आज ( दि. २६ ) भारतीय संघाची घोषणा झाली. निवडसमितीने तीनही फॉरमॅटसाठी संघाची निवड केली असून यातील एकाही संघात भारतीय एकदिवसीय आणि टी - २० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची निवड करण्यात आलेली नाही. 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकदिवसीय आणि टी - २० संघाचे उपकर्णधारपद केएल राहुल सांभाळणार आहे. याचबरोबर त्याच्यावर विकेट किपिंगचाही अतिरिक्त भार असणार आहे. यंदाची आयपीएल राहुलसाठी फलदायी ठरली आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यात ५८७ धावा केल्या आहेत याचबरोबर तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नेतृत्वाची धुराही चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. 

दरम्यान, निवडसमितीने रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोघांच्या निवडीबाबत सावध भुमिका घेतली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम या दोघांच्या दुखापतीचा हालहवाला घेऊन त्याबाबतचा निर्णय घेणार आहे.