रांची : पुढारी ऑनलाईन
कोरोना विषाणू संकटामुळे भारतीय क्रिकेट आणि त्यासंबंधी सर्व कार्यक्रम सध्या पूर्णत: ठप्प आहेत. प्रतिष्ठित टी-२० लीग आयपीएल देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील सेलेब्रिटीज कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत.
अधिक वाचा : पाक क्रिकेटला कोरोनाचा विळखा, सात पॉझिटिव्ह
आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी लॉकडाऊनमुळे रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये कुटुंबासमवेत आहे. यापूर्वीच त्याने फार्म हाऊसवर शेतीसाठी एक ट्रॅक्टर आधीच खरेदी केला आहे. आता या ट्रॅक्टरचा उपयोग धोनी सेंद्रिय शेतीसाठी करत आहे.
अधिक वाचा : बांगलादेशच्या माजी कर्णधाराला कोरोनाची लागण
व्हिडिओमध्ये धोनी एकट्याने ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनी रांचीतील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करताना अशा कॅप्शनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धोनीने महिंद्राचे स्वराज ९६३ एफई ट्रॅक्टर विकत घेतले आहे. त्याची किंमत सुमारे ८ लाख आहे.
अधिक वाचा : जोकोविचच्या प्रशिक्षकालाही कोरोनाची लागण