Thu, Sep 24, 2020 09:16होमपेज › Sports › 'विराटचा चमचा' :आकाश चोप्राचा पलटवार

'विराटचा चमचा' :आकाश चोप्राचा पलटवार

Last Updated: Jan 20 2020 5:56PM
 

 

बेंगळुरु : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात विराटने सेट झालेल्या लॅबुश्चग्नेचा अप्रतिम झेल टिपला. पण, या झेलवरुन ट्विटर वॉर सुरु झाले. एका नेटकऱ्याने भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रावर विराटचा चमचा असल्याचा आरोप केला. त्याला आकाश चोप्राने खरमरीत प्रत्युत्तर दिले. 

वाचा : 'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आत दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर स्मिथ आणि लॅबुश्चग्नेने तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी रचली. त्यात लॅबुश्चग्ने अर्धशतक पूर्ण करुन मोठी खेळी करण्याकडे कूच करत होता. पण, जडेजाच्या गोलंदाजीवर कव्हर्समधून जोरदार फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. विराटने त्याचा अप्रतिम झेल घेतला. 

वाचा : हिटमॅन रोहितने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य!

या झेलनंतर समालोचक आकाश चोप्राने लगेचच या सामन्यातील विराटच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. पण हे आकाश चोप्राचे कौतुक करणे एका नेटकऱ्याला रुचले नाही. त्याने 'विराट कोहलीचा चमचा गेल्या सामन्यात पांडेजींनी (मनिष पांडे) अप्रतिम झेल पकडला होता त्यावेळी का ट्विट केले नाही.' असा सवाल ट्विटरवरुन विचारला. त्याला आकाश चोप्राने 'क्षमा करा मी २०२० मध्ये पकडलेल्या प्रत्येक झेलचे कौतुक केले आहे. कायतर काम कर भावा. ज्यावेळी पांडेजींनी झेल पकडला त्यावेळी मी समालोचन करत होतो. त्याच्यावर बोललो होतो आणि कौतुकही केले होते. मी समोलोचन करत असताना ट्विट करत नाही.' असे प्रत्युत्तर दिले. 

राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मनिष पांडेनेही डेव्हिड वॉर्नरचा एका हातात झेल पकडला होता. 

 "