Tue, Aug 04, 2020 23:10होमपेज › Sports › मुलीमुळे चिडून टीव्ही फोडणाऱ्या आफ्रिदीला 5 वे कन्यारत्न

मुलीमुळे चिडून टीव्ही फोडणाऱ्या आफ्रिदीला 5 वे कन्यारत्न

Last Updated: Feb 15 2020 1:40PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला 5 वे कन्यारत्न झाले आहे. ही माहिती त्याने आपल्या सोशल मीडियावरुन दिली. इन्स्टाग्रामवर आपल्या पाचही मुलींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला 'परमेश्वराचा आशीर्वाद आणि दया माझ्यावर कायम आहे. मला चार गुणी मुली आहेत आता अजून एकीची भर पडली आहे. मी तुमच्या सर्वांबरोबर ही गोड बातमी शेअर करु इच्छितो.' असे कॅप्शनही त्याने दिले.

दरम्यान, शाहीद आफ्रिदीने काही महिन्यापूर्वी एक वादग्रस्त विधान केले होते. त्याने 'माझ्या मुलीने टीव्हीवरील हिंदी मालिका पाहून आरती करण्याचा अभिनय केला होता. त्यावेळी मी रागाने टीव्ही फोडला होता. असे उत्तर दिले होते. त्याला तू कधी टीव्ही फोडला होतास का असा प्रश्न विचारला होता त्यावेळी त्याने असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावरुन टीकाही झाली होती.  

शाहीद आफ्रिदी कायम त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतो. मध्यंतरी खासदार क्रिकेटर गौतम गंभीर याच्याबरोबर जुगलबंदी सुरु झाली होती.