Sun, Sep 27, 2020 03:28होमपेज › Sports › Day Spacial : फक्त ६ तासात संपला होता ५ दिवसांचा कसोटी सामना

Day Spacial : फक्त ६ तासात संपला होता ५ दिवसांचा कसोटी सामना

Last Updated: Feb 15 2020 1:03PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आजच्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला 1932 साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना झाला होता. हा सामना फक्त 5 तास आणि 53 मिनिटात संपला होता. हा सामना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वेळात संपलेला कसोटी सामना म्हणून ओळखला जातो. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन्ही डावात 50 धावांच्या आतच गुंडाळला होता. 

अखेर बुमराहला सूर गवसला, विकेटचा दुष्काळ संपला 

1932 ला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या कसोटी मालिकेतील पाचवा सामना 15 फेब्रुवारीला संपला होता. पण, हा सामना संपल्यानंतर त्याची क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी काळ चाललेला सामना म्हणून नोंद झाली. 1932 नंतर आजपर्यंत हा विक्रम अजून अबाधित आहे. या सामन्यातील 3 दिवस खराब हवामानामुळे वाया गेले होते. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने  89 मिनिटात 36 धावात गुंडाळला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेनही ऑस्ट्रेलियाला 153 धावात रोखले होते. या डावात ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन जायबंदी झाल्याने फलंदाजी अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये गेले होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला काही काळ राहिला असताना दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव सुरु केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेची 5 षटकात 1 बाद 5 धाव अशी अवस्था केली होती. 

मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी 

सामन्याचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी सामना पुन्हा सुरु झाला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानी जरा बरी फलंदाजी करत 3 बाद 30 धावांपर्यंत मजल मारली पण, त्यानंतर त्यांच्या 3 विकेट एकही धाव न करता पडल्या त्यामुळे त्यांची अवस्था 6 बाद 30 अशी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने गचाळ क्षेत्ररक्षण केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आपला पहिल्या डावातील 36 धावांचा टप्पा पार केला. पण, त्यांना फार मोठी उडी मारता आली नाही. त्यांचा दुसरा डाव 45 धावात आटोपला. आफ्रिकेला दोन्ही डावात मिळून 81 धावात करता आल्या. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम अजून दक्षिण आफ्रिकेच्याच नावार आहे.

दक्षिण आफ्रिकेने टाळला पाक दौरा

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या इरोनमोनगर 24 धावा देत 11 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेट इतिहासात सर्वात कमी धावा देत सामन्यात 10 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम अजून कोणाला मोडता आलेला नाही. 

 "