Wed, Aug 12, 2020 21:49होमपेज › Sports › वॉर्नरला प्रतीक्षा विराटच्या 'डिनर इनव्हिटेशन'ची 

वॉर्नरला प्रतीक्षा विराटच्या 'डिनर इनव्हिटेशन'ची 

Last Updated: Jan 15 2020 5:01PM
 

 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कांगारुंच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत सामना 10 विकट्सनी जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून धडाकेबाज डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 128 धावांची नाबाद शकती खेळी केली. वॉर्नर हा भारतीय वातावरणाशी चांगलाच अनुरुप आहे. तो सनराईजर्स हैदराबादकडून आयपीएल खेळतो. त्यामुळे त्याची आणि भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंशी मैत्रीपूर्ण संबध आहेत. सध्या तो अशाच एका मैत्रीपूर्ण डिनर इनव्हिटेशनची वाट बघत आहे. त्याने भारताबरोबरची मालिका सुरु होण्यापूर्वी आयपीएल संघ सनरायजर्स हैदराबादसाठी दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली. तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून डिनर इनव्हिटेशनची वाट बघत आहे. 

वाचा : विराटच्या पदरी ऑस्ट्रेलियात 'खुशी' तर मायदेशात 'गम'

डेव्हिड वॉर्नरने या मुलाखतीत भारतात खेळण्याचा अनुभव कसा असतो हेही सांगितले. तो म्हणतो 'भारतात येणे आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणे हे स्पेशल असते. येथे मोठ्या प्रमाणावर लोक पाठिंबा देण्यासाठी येतात.' याचबरोबर त्याने भारताबरोबरची एकदिवसीय मालिका एका वेगळ्याच उंचीवर असणार आहे. भारतीय संघ चांगला खेळ करत आहे. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे या मालिकेतील सामने वेगळ्या उंचीचे आणि आव्हानात्मक असतील. 

वाचा : रोहित शर्मा आयसीसी 'क्रिकेटर ऑफ द इयर'

डेव्हिड वॉर्नरने नाबाद शतकी खेळी करत या मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. आता तो राजकोट येथे शुक्रवारी  होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या मलिकेतला अखेरचा सामना बेंगळुरु येथे रविवारी होणार आहे.