Fri, May 29, 2020 00:26होमपेज › Sports › कुर्रर्र...अजिंक्य रहाणेच्या लाडकीच बारसं; ठेवलं 'हे' नाव

कुर्रर्र...अजिंक्य रहाणेच्या लाडकीच ठेवलं नाव

Last Updated: Nov 08 2019 12:32PM

आर्या अजिंक्य रहाणेमुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांच्‍या घरी ५ ऑक्टोबर रोजी नवीन पाहुणीचे आगमन झाले. त्‍यानंतर बाप माणूस बनलेल्या रहाणेने स्वतः आपल्या चिमुकलीचा गोंडस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून नामकरण म्‍हणजे बारसं झाल्‍याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

अजिंक्यने आपल्या चिमुकलीचे नाव 'आर्या' असे ठेवले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोला 'आर्या अजिंक्य रहाणे' असे कॅप्शन देऊन ही माहिती सर्वांना दिली आहे. 'आर्या'च्‍या नावात अजिंक्यच्‍या नावातील 'अ' तर राधिकाच्‍या नावातील 'र' याचा उल्‍लेख येत आहे. त्‍यामुळे देखील सोशल मीडियावर 'आर्या' च्‍या नावाची चर्चा रंगली आहे. 

काही दिवसांपूर्वी भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्‍य रहाणेच्‍या घरी नवीन पाहुणीचे आगमन झाल्याची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरकीपटू हरभजन सिंग याने दिली होती. त्‍यानंतर काही दिवसातच रहाणेने स्वतः आपल्या चिमुकली आणि पत्नी राधिका हिचा फोटो शेअर केला होता. मात्र या फोटो चिमुकलीचा चेहरा मात्र दिसला नव्‍हता. आज मात्र अजिंक्य रहाणेकडून चिमुकलीचा गोंडस फोटो शेअर केला आहे. चाहत्‍यांनेही अजिंक्यच्या चिमुकलीच्या गोंडस रुपाचे कौतुक केले आहे. 

अजिंक्यने आपली बालमैत्रिण राधिका धोपावकर सोबत २६ सप्टेंबर २०१४ रोजी विवाह केला. मराठमोळ्या पद्धतीने ते बोहल्यावर चढले. काही दिवसांपूर्वी अजिंक्यने इन्स्टाग्रामवर राधिकाच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करुन ही गोड बातमी दिली होती. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ही मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला होता. आत्तापर्यंत रहाणेने लग्न असेल किंवा डोहाळ जेवण हे सर्व  कार्यक्रम मराठमोळ्या पद्धतीने साजरे केले आहेत.