Sun, Oct 25, 2020 07:29होमपेज › Sports › गावस्करांच्या 'बॉलिंग' विधानावर अनुष्का भडकली!

गावस्करांच्या 'बॉलिंग' विधानावर अनुष्का भडकली!

Last Updated: Sep 25 2020 4:50PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

महान क्रिकेटर सुनील गावस्कर काल (ता.२४) बेंगलोरच्या मॅचनंतर कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मावर आक्षेपार्ह विधान करून वादात सापडले आहेत. अनुष्का शर्माने स्वत: गावस्कर यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. तिने इन्स्टाग्रामवर स्टेट्स लावून म्हणणे मांडले. 

अनुष्का शर्माने म्हणाली, 'मिस्टर गावस्कर तुमचा संदेश हा चांगला नव्हता. खर तर मला तुम्ही आवडता. पण, तुम्ही एखाद्या खेळाडूच्या खराब खेळाला त्याची पत्नी जबबादार असते वक्तव्य करण्याचा असा विचार कसे करु शकता? मला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समालोचन करताना क्रिकेटरच्या वैयक्तिक आयुष्याचा कायम आदर केला आहे. तुम्हाला असे वटत नाही का की तोच आदर माझ्या किंवा आमच्या बाबतीत दाखवावा? मला खात्री आहे की माझ्या पतीच्या कालच्या खेळाबाबत वक्तव्य करताना तुमच्या डोक्यात अनेक शब्द आणि वाक्य आली असतील किंवा तुमच्या शब्दांना माझे नाव घेतल्यावरच अर्थ प्राप्त होणार होता? हे २०२० आहे आणि माझ्या बाबतीच अजून गोष्टी बदललेल्या नाहीत. मला क्रिकेटमध्ये ओढण्याचे कधी बंद होणार आणि चिमटा काढणारी वक्तव्य करताना माझा वापर बंद कधी होणार? मिस्टर गावस्कर तुम्ही महान क्रिकेटर आहात आणि जंटलमन्स गेममध्ये तुमचे नाव उच्च स्तरावर आहे. मला फक्त तुमचे वक्तव्य ऐकल्यानतंर काय वाटले हे सांगायचे होते.'

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विरोधात दुबईमध्ये गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार चांगले प्रदर्शन करू शकला नाही. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद होऊन माघारी परतताना भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकर म्हणाले की, विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगचा सराव केला.

वाचा - अनुष्काबद्दल 'या' माजी कर्णधाराचे आक्षेपार्ह वक्तव्य

या वक्तव्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यावर टीका झाली. सोशल मीडियावर युजर्स चांगलेच भडकले होते. अनुष्कानेही गावस्करांना सडेतोड उत्तर दिले आहे.

 "