Fri, Sep 18, 2020 19:39होमपेज › Sports › विराटची ‘या’ यादीत झाली घसरण; मिळाला शंभरावा नंबर 

विराटची ‘या’ यादीत झाली घसरण; मिळाला शंभरावा नंबर 

Published On: Jun 12 2019 5:40PM | Last Updated: Jun 12 2019 5:40PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आयसीसीने नुकतेच किंग कोहली असे चित्र रंगवले होते. हे चित्र आयसीसीने आपल्या ट्विटर हँडेलवरुन शेअरही केले पण, यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनचा चांगलाच जळफळाट झाला होता. त्याने आयसीसीच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती. पण, आयसीसीने टेस्ट आणि कसोटी मधूील फलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल आहे त्यामुळे त्याला ‘किंग’ केले असे म्हटले आहे. जरी फलंदाजीतील रॅकिंगमध्ये कोहली अव्वल असला तरी त्याचे श्रीमंतीचे रॅकिंग घसरले आहे. फोर्ब्स मासिकाच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहली शंभराव्या स्थानावर फेकला गेला आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहली टीव्हीवरील बऱ्याच जाहीरातीत झळकत आहे. त्यामुळे विराट चांगलेच पैसे छापत असणार असा आपला ग्रह होणे स्वाभाविक आहे. तसे गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे उत्पन्न ७ कोटींनी वाढलेही आहे. पण, फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत गेल्या वर्षी ८३ व्या स्थानावर असलेल्या विराट यंदा १०० व्या स्थानावर फेकला गेला आहे. यंदा विराटने १७३ कोटींचा गल्ला कमावला आहे. तरीही विराटचे रँकिंग घसरले. जरी विराट शंभराव्या स्थानावर असला तरी तो एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याचा समावेश फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत झाला आहे. 

फोर्ब्सच्या यादीत जवळपास ८८१ कोटींच्या वर कमाई करणारा फुटबॉलपटू मेसी पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो ७५६ कोटी कमवून दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.