Thu, Dec 03, 2020 07:11होमपेज › Sports › आर्किटेक्ट वरूण चक्रवर्तीची टीम इंडियात वर्णी

आर्किटेक्ट वरूण चक्रवर्तीची टीम इंडियात वर्णी

Last Updated: Oct 26 2020 10:29PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल झाल्यानंतर लगेच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा आज बीसीसीआयने केली. टी २० संघात वरूण चक्रवर्ती या नवख्या खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. 

वरूण चक्रवर्ती आयपीएलच्या १३ व्या हंगामात कोलकता संघात खेळला आहे. या अगोदर तो पंजाबच्या टीम मधून खेळला आहे. २९ वर्षीय वरूण चक्रवर्तीचा जन्म चेन्नई येथील आहे.  तो तमिळनाडू कडून खेळतो.  वरूण चक्रवर्तीने सुरुवातीला विकेट किपिंग केली नंतर फास्ट बॉलिंग केली. पण त्याला त्याच्या फिरकी गोलंदाजीने टीम इंडियाची दार उघडून दिले.

वरूण चक्रवर्तीने शालेय स्तरावर क्रिकेट खेळल्यानंतर क्रिकेट सोडून शैक्षणिक करिअरकडे तो वळला. त्याने आर्किटेकचे शिक्षण पूर्ण केले आणि चांगली नोकरी पकडली. पण त्याचे तेथे मन रमले नाही. तो पुन्हा क्रिकेटकडे वळला. सर्वात प्रथम तो तमिळनाडू प्रिमीयर लीगमध्ये चमकला. यामुळेच त्याला आयपीएल मध्ये संधी मिळाली. त्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ११ सामन्यात १३ विकेटा घेतल्या आहेत.दिल्ली विरुध्दच्या सामन्यात त्याने २० धावांत ५ बळी घेत निवड समितीचे वेधले आहे.