होमपेज › Sports › सौरभ गांगुलींची कोहलीकडून 'ही' आहे अपेक्षा 

सौरभ गांगुलींची कोहलीकडून 'ही' आहे अपेक्षा 

Last Updated: Dec 03 2019 6:28PM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारताने कोलकात्यात खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगला देशचा तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात डावाने पराभव केला. ही पिंक बॉलवरची पहिलीच कसोटी बीसीसीआयचे नुतन अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या पुढाकाराने झाली होती. आता गांगुली यांनी विराट सेनेने मलिकेतील एक तरी कसोटी पिंक बॅलवर खेळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  

भारताने अखेरीस पिंक बॉलवरील कसोटीसाठी अनुकूलता दाखवत आपल्या पहिल्या पिंक बॉल कसोटीचे जोरदार मार्केटिंग केले होते. त्यामुळे या कसोटीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. पण, क्रिकेट जाणकारांच्या मते हा प्रतिसाद हळू हळू कमी होईल. पण, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे पिंक बॉल कसोटीबाबत चांगलेच उत्साही आहेत. त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'मी याबाबत चांगलाच आशावादी आहे. मला वाटते की कसोटीसाठीचा हा भविष्याचा मार्ग असेल. प्रत्येक नाही पण, मालिकेतील एक तरी कसोटी दिवस-रात्र असावी.' गांगुलींच्या प्रयत्नामुळे झालेल्या पहिल्या दिवस रात्र कसोटीला कोलकातावासियांनी  अभुतपूर्व प्रतिसाद दिला होता. गांगुली पुढे म्हणाले की 'मी माझा अनुभव बोर्डाबरोबर शेअर केला आहे. दिवस-रात्र कसोटीचा हा प्रयोग देशातील इतर भागातही करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलकाता कसोटीनंतर सगळे तयार आहेत. कोणीही फक्त ५ हजार प्रेक्षकांसमोर कसोटी क्रिकेट खेळण्यास तयार नाही.'

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयच्या पिंक बॉलवर खेळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. पण, त्याने एखादी खेळणे ठिक आहे पण, हा नियम व्हायला नको अशीही प्रतिक्रिया दिली होती.