Thu, Apr 02, 2020 00:04होमपेज › Sports › 'पुरस्कार' विजेत्या सचिनला 'बीसीसीआय' अध्यक्षांचा पुन्हा चिमटा 

'पुरस्कार' विजेत्या सचिनला 'बीसीसीआय' अध्यक्षांचा पुन्हा चिमटा 

Last Updated: Feb 19 2020 1:19AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सचिन तेंडुलकरच्या वर्ल्डकप व्हिक्टरी मार्चला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च लॉरेयस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सचिन तेंडुलकर बर्लिनमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने बर्लिनमधील प्रसिद्ध ब्रॅडनबर्ग गेट येथे उभारुन फोटो काढला आणि तो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या पोस्टवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मजेदार प्रतिक्रिया देत सचिनला चिमचा काढला. 

सचिन तेंडुलकर लॉरेयस पुरस्कार स्वीकारण्यासाठी बर्लिनमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने बर्लिनमधील आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर सौरभ गांगुली यांनी "तेंडुलकर.. मी चुकीचा नाही..." अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया वाचल्यावर पहिल्यांदा याचा संदर्भ लागणार नाही. पण, या प्रितिक्रियेला सचिनची गेल्या दोन दिवसापूर्वीची ऑस्ट्रेलियातून केलेल्या पोस्टचा संदर्भ आहे. 

सचिन बुशफायर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. तेथे तो मदतनिधीसाठी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात रिकी पॉटिंगच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून गेला होता. यादरम्यान सचिनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऊन खात बसलो आहे असे कॅप्शन दिले होते. त्यावर सौरभ गांगुली यांनी 'कोणा कोणाचे नशिब फार चांगले असते... सुट्टीचा आनंद घ्या' अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर सचिनने आम्ही ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्यांसाठी 10 लाख अमेरिकन डॉलरची मदत गोळा केली असे सांगितले. 

सौरभ गांगुलीचा रोख हा सचिनवर प्रशासनातील कोणतीही जबाबदारी नाही त्यामुळे त्याला मुक्त संचार करता येतो याकडे होता. त्यानंतर सचिनने पुरस्कार स्वीकारण्यासाठी बर्लिनमध्ये गेलेला फोटो टाकला. त्याच्यावर सौरभ यांनी मी काही चुकीच बोललो नाही असे म्हणत त्याने चिमटा काढला.