Sat, Oct 24, 2020 23:14होमपेज › Sports › फिंच पॅव्हेलियनमध्येच ई - सिगारेटचे झुरके घेताना कॅमेऱ्यात कैद ( Video ) 

फिंच पॅव्हेलियनमध्येच ई - सिगारेटचे झुरके घेताना कॅमेऱ्यात कैद ( Video ) 

Last Updated: Oct 18 2020 5:39PM
दुबई : पुढारी ऑनलाईन 

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने काल राजस्थान रॉयल्सचा अखेरच्या षटकापर्यंत रंगेलल्या सामन्यात पराभव केला. आरसीबीच्या या विजयचा शिल्पकार ठरला तो २२ चेंडूत ५५ धावा करणारा एबी डिव्हिलियर्स. पण, सोशल मीडियावर डिव्हिलियर्स नाही तर आरसीबीचा सलामीवीर अॅरोन फिंच चांगलाच ट्रेंडमध्ये आला. त्याने सामन्यात फक्त १४ धावा केल्या होता. पण, त्याने पॅव्हेलियनमध्ये जो काही कारनामा केला त्यावरुन तो ट्रेंडवर आला. 

फिंच एवढा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो पॅव्हेलियनमध्ये ई - सिगारेटचे झुरके घेत असताना कॅमेऱ्यात कैद झाला. हे फुटेज सामना सुरु असताना लाईव्ह गेले. हा प्रकार आरसीबीला अखेरच्या षटकात १० धावांची गरज असताना घडला. गुरकीरत सिंग मानने दोन चेंडू खेळल्यानंतर कॅमेरा दोन्ही पॅव्हेलियनकडे वळला. यावेळी त्यांना पॅव्हेलियनमधील चिंतेचे वातावरण टिपायचे होते. 

पण, त्यांच्या कॅमेऱ्यात फिंट पॅव्हेलियनच्या दारात उभारून ई - सिगारेटचे झुरके मारताना कैद झाला. यानंतर लगेच कॅमेऱ्याची दुसरी फ्रेम घेण्यात आली. पण, चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून हा सेकंद दोन सेकंदाचा झुरका सुटला नाही. याचा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. 

 "