Thu, Sep 24, 2020 10:53होमपेज › Sports › आणखी एका सलामीवीराने निवड समितीची डोकेदुखी वाढवली!

आणखी एका सलामीवीराने निवड समितीची डोकेदुखी वाढवली!

Last Updated: Jan 19 2020 7:46PM
लिंकन (न्यूझीलंड) : पुढारी ऑनलाईन

न्यूझीलंड इलेव्हन विरुद्ध भारत अ साठी दुसर्‍या सराव सामन्यात मुंबईकर धडाकेबाज पृथ्वी शॉने १०० चेंडूत १५० धावांची दमदार खेळी करत दुखापतीनंतर चमकदार पुनरागमन केले. भारतीय वरिष्ठ संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या २० वर्षीय शॉने दीडशतकी खेळी केली. या दमदार खेळीमध्ये त्याने २२ चौकार आणि दोन षटकार लगावले. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.२ षटकांत ३७२ धावा केल्या. भारताने हा सामना १२ धावांनी जिंकला. 

अधिक वाचा : रोहित सुसाट, पण विराट अव्वल स्थानी कायम!

आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड इलेव्हन संघाला ५० षटकांत ३६० धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून जॅक बॉयलने झुंजार १३० धावांची खेळी केली. शॉच्या झंझावती खेळीने न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी प्रबळ दावेदारी दिली आहे. त्यामुळे निवड समिती नक्कीच सुखावली असणार आहे. न्यूझीलंडमध्ये पहिली कसोटी २१ फेब्रुवारी रोजी हॅमिल्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे सुरू होईल. दुसरी कसोटी २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चमधील हेले ओव्हल येथे खेळली जाईल.

अधिक वाचा : 'धोनीने शब्द पाळला, तो शब्दाचा पक्का' 

आठ महिन्यांच्या डोपिंग बंदीनंतर मैदानात उतरलेला शॉ शानदार फॉर्ममध्ये आहे. परंतु कर्नाटकविरुद्ध मुंबईत झालेल्या रणजी करंडक सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याला खांद्यावर दुखापत झाली. ज्यामुळे त्याला न्यूझीलंडमधील भारताच्या पहिल्या सराव सामन्यात खेळता आले नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर शॉने झुंजार खेळी केली. 

अधिक वाचा : विराटची आकडेवारी धोनी, गांगुलीपेक्षा भारी

 "