बासीसीआयची तुर्तास खेळाडूंच्या मानधनाला कात्री नाही 

Last Updated: May 15 2020 7:49PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयने खेळाडूंना तुर्तास दिलासा दिला आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी आज ( दि 15 ) सांगितले की सध्या तरी बीसीसीसआय खेळाडूंच्या मानधनाला कात्री लावण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही आहे. बीसीसीआयला सामने आणि आयपीएल सारखी सोन्याची अंडी देणारी स्पर्धा पुढे ढकलावी लागल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 

धुमल यांनी सांगितले की क्रिकेटचे सामने कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलले आहेत. पण, खेळाडूंच्या मानधनाला कात्री लावणे हा पर्यायाचा विचार सर्वात शेवटी केला जाईल. ते म्हणाले की 'आम्ही आताच मानधन कपातीबाबत चर्चा करत नाही आहोत. आम्हाला आशा आहे की आर्थिक संकटातवरही आम्ही मात करु. पण, हे खरं आहे की आयपीएलमुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होईल. जर अशी परिस्थिती आलीच तर आम्ही मानधन कपातीबाबत विचार करु पण, तो अंतिम पर्याय असेल. पण, आम्ही काही करुन खेळाडूंच्या मानधन कपातीची वेळ येणार नाही हे पाहू.' 

जरी खेळाडूंच्या मानधनला हात लावणार नसलो तरी धुमल यांनी बीसीसीआय कॉस्ट कटिंग आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'आम्हाला कोणत्या खर्चात कपात करायची आहे आणि काय बचत आहे यावर काम करत आहोत. ही सतत सुरु असणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कोरोना संकटाआधी काही सुरु करण्यात आली आहे. या आर्थिक तोट्यावरही आम्ही मात करु, आम्ही कपात करण्याच्या विचारात आहे याचबरोबर काही उत्पन्नाच्या साधनांवरही काम करत आहोत.'

बीसीसीआय तोटा भरून काढण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. धुमल म्हणाले, 'सध्या खेळाडूंबाबत कोणतीही कपात नाही. पण, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खर्चाबाबत कपात करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्च, राहण्याचा खर्च किंवा कर्मचारी कपात या सर्व पैलूंचा विचार सुरु आहे.'

याचबरोबर धुमल यांना लॉकडाऊननंतर काय योजना आहेत याबाबत विचारले असता त्यांनी लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार याच्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. ते म्हणले 'नक्कीच आम्ही याबाबत विचार करत आहोत. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी काय करता येईल ते करत आहेत. जर लॉकडाऊनचे नियम शिथील झाले तर काय करता येईल याचा विचार सुरु आहे. जर प्रवासावर बंधने आली नाहीत तर खेळाडू एका ठिकाणी येऊ शकतील. जर हे शक्य झाले नाही तर आम्ही स्थानिक मैदानावर खेळाडूंना कौशल्यावर आधारित सराव करण्याबाबत काही योजना आखता येईल का या पर्यायाचा विचार करु.' 

जळगाव : प्लॉट खरेदीत फसवणूक; डॉक्टरसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल


संजय राऊतांनी फडणवीसांना करून दिली 'त्या' कुंडल्यांची आठवण


विजयाच्या चाव्या अपक्षांच्या हातात, राजकीय घोडे बाजार होण्याचे चित्र 


शहीद जवान यश देशमुख यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप


अभिनेत्री नेहा महाजनचा सातासमुद्रापार डंका!


इराणचे शास्त्रज्ज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची गोळ्या झाडून हत्या


आ. भारत भालकेंच्या निधनाने भीमा परिवाराचा आधारवड हरपला : धनंजय महाडिक


त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएम मोदींच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!


अमृता फडणवीस गाण्यावरून ट्रोल; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


'शालेय विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे'