Fri, Sep 18, 2020 19:37होमपेज › Sports › माजी कर्णधार धोनीचा विक्रम विद्यमान कर्णधार विराटने मोडला 

माजी कर्णधार धोनीचा विक्रम विद्यमान कर्णधार विराटने मोडला 

Last Updated: Jan 29 2020 2:57PM
 

 

 

हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी - 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने दमदार 89 धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर भारताने मधली फळी लवकर बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. पण, विराटने 38 धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येच्या जवळ पोहचले. याचदरम्यान, त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मागे टाकला.

वाचा : फुलराणीच्या हातात कमळ; सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून टी - 20 सामन्यात भारताकडून 1 हजार 112 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून टी - 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर होता. तो विक्रम विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी - 20 सामन्यात मोडला. विराटच्या कर्णधार म्हणून आता 1 हजार 114 धावा झाल्या आहेत. आता विराट टी - 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. 

वाचा : दमदार कमबॅक: भालाफेकपटू नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र 

टी - 20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत 1 हजार 273 धावा करत फाफ ड्युप्लिसिस पहिल्या क्रमांकावर तर 1 हजार 148 धावा करत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नंबर लागतो. 

 "