Tue, Aug 11, 2020 22:20होमपेज › Sports › World Women's Boxing Championships : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक

मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक

Last Updated: Oct 10 2019 12:34PM

भारताची  महिली बॉक्सर मेरी कोम (फोटो : ANI)नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

भारताची  महिली बॉक्सर मेरी कोमने जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चीत केले आहे. या कामगिरीसह मेरी कोमचे जागतिक अजिंक्यद स्पर्धेमधील आठवे पदक निश्चीत झाले आहे. 

 रशियाच्या Ulan-Ude भागात सुरु असलेल्या स्पर्धेत सुपर मॉम मेरी कोमने वेलेन्सिया व्हिक्टोरियावर ५-० ने मात केली. यासोबतच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमच्या नावावर सहा सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक आहे. यासोबतच मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे.