Fri, Jun 05, 2020 17:44
    ब्रेकिंग    होमपेज › Sports › मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकल्यानंतर मुलाचा आनंद गगणात मावेना

मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकल्यानंतर मुलाचा आनंद गगणात मावेना

Last Updated: Dec 03 2019 10:24PM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

फुटबॉल जगतात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्यातील स्पर्धा जगजाहीर आहे. या दोघांमध्ये सध्याचा महान फुटबॉलर कोण अशी स्पर्धा सुरु आहे दोघांचेही चाहते जगभरात पसरले आहेत. या दोघांमध्ये गोल बरोबरच पुरस्कर पटकावण्याचीही स्पर्धा सुरु असते. बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर मेस्सीने  बॅलोन डी ओर हा फुटबॉल जगतातील सर्वात मोठा पुरस्कार सहाव्यांदा मिळवला. त्याने रोनाल्डोला मागे टाकत सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. पण, या पुरस्कार वितरण समारंभात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते त्याचा धाकटा मुलगा मॅटेओने. बाबांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आनंद गगणात मावत नव्हता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

लिओनेल मेस्सीने डच बचावपटू विरगील व्हॅन डिजक आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डोला मागे टाकत विक्रमी ६ व्यांदा बॅबॅलोन डी ओर या प्रतिष्ठीत पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यानंतर त्याच्या धाकट्या मुलाने मॅटेओने एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे या मॅटेओने आपल्या मोठ्या भावाला आणि खुद्द वडिलांनाच चांगलेच ट्रोल केले होते. तो आपल्या भावाला चिडवण्यासाठी रिअल माद्रिदने गोल मारल्यावर जल्लोष करायचा. तर वडिलांबरोबर फुटबॉल खेळताना तो आपण लिव्हरपूलचा खेळाडू असल्याचे सांगायचा कारण लिव्हरपूलने बार्सिलोनाला पराभूत केले होते. पण, आज वडिलांना मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला मनस्वी आनंद झाला त्याने तो व्यक्तही केला. यामुळे जरी वडिलांनी सर्वाधिक वेळा  बॅलोन डी ओर पुरस्कार मिळवला असला तरी या लाईम लाईटमध्ये राहिला तो फक्त मॅटेओ मेस्सी.

पुरस्कार प्राप्तीनंतर मेस्सीने 'मी पहिला बॅलोन डी ओर पुरस्कार मिळवून १० वर्षे झाली. मला आठवतंय मी पॅरिसला माझ्या ३ भावांसोबत आलो होतो. मी त्यावेळी २२ वर्षांचा होतो आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मला आशा आहे की मला माझ्या फुटबॉलचा आनंद घेण्यासाठी आता काही वर्षेच राहिली आहेत. माझे वय होत असल्याने हे क्षण जास्तच आनंददायी आहेत कारण माझी निवृत्तीची वेळ आता जवळ आली आहे आणि हे कठिण आहे.' अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या १० वर्षात हा पुरस्कार मिळवण्याची स्पर्धा मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातच होती. पण, ही स्पर्धा गेल्या वर्षी लुका मॉड्रिकने मोडत पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.