Wed, Sep 23, 2020 03:15होमपेज › Sports › आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार

आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार

Last Updated: Jul 01 2020 7:28PM
दुबई : पुढारी ऑनलाईन 

आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अखेर आज (दि.1) आपले पद सोडले. त्यामुळे आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र चेअरमनचा कार्यकाळ समाप्त झाला. मनोहर हे नोव्हेंबर 2015 ला आयासीसीचे चेअरमन झाले होते. आयसीसीने 'आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी आपले पद सोडले आहे. त्यांनी दोन - दोन वर्ष असे मिळून चार वर्षाचा कार्यकाळात आयसीसीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये जोपर्यंत नवीन चेअरमन निवडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हाईस चेअरमन इम्रान ख्वाजा चेअरमन पदाचा अतिरिक्त भार सांभाळतील.' असे आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे. 

ब्रावो! रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू

आयसीसीच्या नियमांनुसार शशांक मनोहर हे अजून 2 वर्षाची एक टर्म आयसीसीचे चेअरमन राहू शकले असते. 62 वर्षाच्या पेशाने वकील असेलल्या शशांक मनोहर यांनी 2008 ते 2011 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपदही भुषवले होते. 

अखेर भारतीय पंच आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट 

आयसीसी बोर्ड नव्या चेअरमन निवड प्रक्रियेला पुढच्या आठवड्यात मान्यता देण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयसीसीचे कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी शशांक मनोहर यांचे त्यांच्या नेतृत्वासाठी आणि त्यांनी आयसीसीचे चेअरमन म्हणून खेळासाठी जे योगदान दिले त्याबद्दल आभार मानले. तर व्हाईस चेअरमन ख्वाजा म्हणाले की, 'शशांक मनोहर यांनी खेळासाठी जे काही केले त्यासाठी क्रिकेट त्यांचे कायम ऋणी राहील. त्यांनी आयसीसी आणि क्रिकेटला एका चांगल्या स्थितीत आणून पद सोडत आहेत.'

 "