Mon, Aug 03, 2020 15:30होमपेज › Sports › रोहित शर्माला आयसीसी 'क्रिकेटर ऑफ द इयर' सन्मान

रोहित शर्मा आयसीसी 'क्रिकेटर ऑफ द इयर'

Last Updated: Jan 15 2020 12:34PM

हिटमॅन रोहित शर्मानवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) २०१९ वर्षातील पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. २०१९मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भारतीय संघाचा हिटमॅन रोहीत शर्माने पटकावला. याबरोबरच या पुरस्कारात भारताच्या दीपक चहरने एक विशेष पुरस्कार पटकावला. या दोघांबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या विशेष कृतीमुळे गौरवण्यात आले आहे.

भारताचा हिटमॅन रोहितने यंदाच्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेत ५ शतकांसह एकूण ७ शतकी खेळी केल्या. त्याने वन डे क्रिकेटमध्ये २०१९ मध्ये २८ सामन्यांत ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे रोहितला २०१९मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

Image

भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली.

Image

भारताच्या दीपक चहरने २०१९ मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार पटकावला. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिकसह ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ट्वेंटी-20त हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय ठरला. 

Image

श्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला आहे.

6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 2019

6/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 2012

6/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 2011

6/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017