Wed, Aug 12, 2020 04:05होमपेज › Sports › हैदराबाद एन्काऊंटरवर मांजरेकर म्हणतात 'ये पब्लिक हैं ये सब जानती हैं'

हैदराबाद एन्काऊंटरवर मांजरेकर म्हणतात 'ये पब्लिक हैं ये सब जानती हैं'

Last Updated: Dec 07 2019 8:10PM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विंडीजच्या 208 धावांचा थरारक पाठलाग केला असला तरी माध्यमात चर्चा होती ती हैदराबाद बलात्कारातील आरोपींचा केलेल्या एन्काऊंटरची. या एन्काऊंटरवर समाजातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात सेलिब्रेटी तसेच खेळाडूंनीही आपले मत व्यक्त केले. असेच मत भारताचे माजी खेळाडू आणि सध्या समोलोचकाची भुमिका पार पाडत असलेल्या संजय मांजरेकरांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

त्यांनी ' किशोर कुमार यांचे एक प्रसिद्ध गाणे आहे. ये पब्लिक हैं ये सब जानती हैं! लोक इतकेही दुधखुळे नाहीत.' असे ट्विट केले आणि रेपिस्ट एन्काऊंटर असा हॅशटॅगही वापरला.  

दरम्यान, शुक्रवारी सकाळी हैदराबाद पोलिसांनी आरोपींना अधिक तपासासाठी घटनास्थळी नेले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून घेतल्या आणि पळून जाऊ लागले. दरम्यान त्यांनी पोलिसांवर गोळीबारही केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात चारही आरोपी ठार झाले. या एन्काऊंटर वरुन बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी या एन्काऊंटरचे समर्थन केले आणि हैदरबाद पोलिसांचे अभिनंदनही केले. पण, काही लोकांनी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.