Fri, Oct 30, 2020 19:25होमपेज › Sports › अन् पांड्याने केल्या स्वतःच्याच दांड्या गूल(Video)

अन् पांड्याने केल्या स्वतःच्याच दांड्या गूल(Video)

Last Updated: Sep 24 2020 9:18AM
शारजा : पुढारी ऑनलाईन

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमधील काल झालेल्या पाचव्या लढतीत अनोखी विकेट पाहायल मिळाली. ही लढत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगली होती. मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत १९५ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचे मोठे योगदान ठरले. मात्र, हार्दिक पांड्याच्या आत्मविश्वासाने त्याचा स्वतःचाच घात झाला अन् हिट विकेटही झाला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान रोहितने तुफान फलंदाजी करत ८० धावा खेचल्या. यामध्ये त्याने अर्धशतकही ठोकले. पण शिवम मावीला षटकार मारण्याच्या नादात तो ८० धावांवर झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर कायरन पोलार्ड आला. त्याने आणि हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण,  १९ व्या षटकात यॉर्कर चेंडुला टोलवण्याच्या नादात पांड्याची बॅट स्टंपला लागली. आणि १८ धावा करून तो हिटविकेट झाला. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. 

आयपीएलमध्ये हिटविकेट होणारा तो ११ वा खेळाडू असून गोलंदाज आंद्रे रसेलला अशा पद्धतीने पहिल्यांदाचा हिटविकेट मिळाली. पांड्यापूर्वी २०१६ ला हैदराबाद सनराईजकडून खेळताना युवराज सिंगदेखील हिटविकेट झाला होता. 

 "