Mon, Mar 08, 2021 17:56
टी. नटराजनच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर

Last Updated: Feb 23 2021 11:40AM

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

सध्या क्रिकेट जगतात खेळाडूंच्या घरी पाळाणा हालत आहे. कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज टी नटराजन, जलदगती गोलंदाज उमेश यादव, तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन या सर्व खेळाडूंना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्या नन्ह्या परीचा पहिला फोटो समोर आला आहे. 

काही वेळा घरात एखादं बाळ जन्माला आलं की त्याचा पायगुण काही वेळेला पाहायला मिळतो, याचाच प्रत्यय नटराजनला आला होता. मुलीच्या जन्मानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्या बातमी मिळाली होते. काल नटराजनने आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मुलीचे नाव हाणविका ठेवल्याची माहिती दिलीच. त्याचसोबत त्याने जीवनातील सर्वात महत्त्वाचे गिफ्ट आहे. आनंदाच्या क्षणाचे कारण हाणविका तू आहेस. तसेच, आम्हाला आई वडिल म्हणून निवडल्याबद्दल हाणिविकाचे आभार मानत तिला लड्डू असे म्हटले आहे.

६ नोव्हेंबरला नटराजची पत्नी पवित्राने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी नटराजन हा युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी आला होता.