Wed, Sep 23, 2020 02:31होमपेज › Sports › टेस्ट चॅम्पियनशिप: आठ जुलैपासून इंग्लंड-विंडीज भिडणार

टेस्ट चॅम्पियनशिप: आठ जुलैपासून इंग्लंड-विंडीज भिडणार

Last Updated: Jul 02 2020 6:14PM

संग्रहित छायाचित्रमॅन्चेस्टर : पुढारी ऑनलाईन 

कोरोनामुळे १३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे. मात्र, आता क्रेकेट सामने सुरू होण्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. मालिकेतील पहिला सामना हॅम्पशायरच्या रोझ बाउल उर्फ एजॅस बाऊल मैदानावर खेळला जाणार आहे. 

क्रिकेटच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. गोलंदाज यापुढे चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करणार नाही. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात स्थानिक पंच असणार आहेत. तसेच क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद स्टेडियमवर उपस्थित राहून घेता येणार नाही. 

अधिक वाचा : अखेर भारतीय पंच आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट 

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडने ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत. ब्रिटीश संघ १४६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे विंडीज संघाने दोन सामने खेळले आहेत. या दोन्हीमध्ये सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

विंडिज खेळाडूंच्या टी शर्टवर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर'चा लोगो....

वेस्ट इंडीजचा संघ 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' हा लोगो असलेला टी-शर्ट परिधान करून मालिकेत खेळेल. आयसीसीनेही त्याला मान्यता दिली आहे. हा लोगो टी-शर्टच्या कॉलरवर असेल. अमेरिकेत पोलिसांच्या मरहाणीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध जोरदार आंदोलन करण्यात आली. त्याच पार्श्वभूमिवर वेस्ट इंडिजच्या संघाने 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' हा लोगो असलेला टी-शर्ट परिधान करून कसोटी सामने खेळण्याचा निर्ण घेतला आहे. फुटबॉल आणि क्रिकेटसह जगभरातील सर्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चळवळीस पाठिंबा दर्शविला.

अधिक वाचा : ब्रावो! रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू

विंडिजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला की, वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठविणे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने जनजागृतीसाठी मदत केली पाहिजे. आम्ही इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी आलो आहोत. असे असले तरी सध्या सुरू असलेल्या समानतेच्या आणि न्यायाच्या लढ्यात आमचा सहभाग असणार आहे. 

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर हा लोगो ग्राफिक्स डिझायनर अलिशा होसना यांनी डिझाइन केले आहे. असाच लोगो फुटबॉल टूर्नामेंट इंग्लिश प्रीमियर लीगमध्येही वापरला गेला. लीगच्या सर्व २० संघांतील खेळाडूंनी लोगोसह टी-शर्ट परिधान करून सामना खेळला.

अधिक वाचा : आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार

 "