गुडघे टेकवून इंग्लंड आणि विंडिज खेळाडूंचा 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'ला पाठिंबा!

Last Updated: Jul 08 2020 8:49PM
Responsive image


साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीसामन्याने कोरोना संकटामुळे थांबलेल्या क्रिकेटची पुन्हा आज (दि.८) सुरुवात झाली. त्याचबरोबर सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावर आपला एक गुडघा टेकवून 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. याचबरोबर सामन्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळून कोरोना महामारीत जीव गमावलेल्या आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू एव्हर्टन विकेस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

LIVE : तब्बल पाच महिन्यांनी क्रिकेट सुरु पण..

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या दोन्ही संघांनी 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' या वर्णद्वेष विरोधी आंदोलनाला आधीच पाठिंबा दर्शवला आहे. या दोन्ही संघांनी आपल्या जर्सीवर याचे समर्थन करणारा लोगो लावला आहे. 

वाढदिनी सौरभ गांगुली यांनी केली मोठी घोषणा!

'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' या चळवळीने अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिसाच्या निर्दयीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर जोर पकडला आहे. डेरेक चौविन या पोलिसाने फ्लॉईड यांच्या मानेवर आपला गुडघा रेटला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.