Wed, Jan 20, 2021 08:37होमपेज › Sports › 'त्यामुळे' द्युती चंदला विकावी लागणार बीएमडब्ल्यू!

'त्यामुळे' द्युती चंदला विकावी लागणार बीएमडब्ल्यू!

Last Updated: Jul 11 2020 5:32PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताची अव्वल धावपटू द्युती चंदला सध्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैसे अपुरे पडत आहेत. त्यामुळे ती आता सरावासाठी लागणारा आपला खर्च भागवण्यासाठी आपली बीएमडब्ल्यू विकण्याचा विचार करत आहे.   

दुतीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'माझा सराव चांगल्या पद्धतीने सुरु आहे. मी सध्या भुवनेश्वरमध्ये सराव करत आहे. टोकियो ऑलिम्पिक सुरुवातीला ठरल्या वेळेत होणार होते त्यामुळे सरावासंबंधी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत कोणतीही अडचण नव्हती. पण, कोरोना महामारीमुळे ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. मी माझ्या प्रायोजकांकडून मिळालेले सर्व पैसे खर्च केले आहेत. आता मला सरावासाठी पैशाची गरज आहे. आता मला नव्या प्रायोजकांची गरज आहे. पण, कोरोना संकटामुळे मला प्रायोजक मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे मी आता माझी कार विकण्याचा विचार करत आहे.'

Live : इंग्लंडची दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात 

दुती चंदला नुकतेच 2020 च्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. दुती म्हणते की कोरोनाचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर सर्वात जास्त पडत आहे. सध्या कोणतेही प्रायोजक खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी तयार नाहीत. 'सरकारकडे सध्याच्या घडीला पैसे नाहीत. कोरोनाच्या संकटात त्यांच्याकडे पैसे मागणे बरे दिसत नाही. कोरोनाचा परिणाम आमच्या सारख्या खेळाडूंवर अधिक झाला आहे. कोणतीही स्पर्धा नजिकत्या काळात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रायोजक मिळणे अवघड झाले आहे. हा कठिण काळ आहे. जे कोण हॉस्टेलमध्ये सराव करत आहेत ते कोरोनामुळे अधिक प्रभावित झाले आहेत. ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेले आहे. लॉकडाऊमुळे आम्हाला घरी बसावे लागले. आता आम्हाला आमची उत्तम फिटनेस लेवल साध्य करण्यासाठी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.'  

वगळलेल्या ब्रॉडला अँडरसन म्हणाला 'हीच तर इंग्लंडची ताकद'

दुती चंदने 25 मे पासून कलिंगा स्टेडियमवर दोन महिन्याच्या गॅपनंतर सरावास सुरुवात केली. आता तिच्याकडे 29 जून 2021 पासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी आणि पात्रता फेरीसाठी एका वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे.