Mon, Aug 03, 2020 14:59होमपेज › Sports › वॉर्नरचे आता एकच लक्ष रिकी पाँटिंग 

वॉर्नरचे आता एकच लक्ष रिकी पाँटिंग 

Last Updated: Jan 14 2020 8:21PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ठेवलेल्या 256 धावांचे आव्हान  आरामात पार केले. यात मोलाचा वाटा उचलला तो शतकवीर डेव्हिड वॉर्नरने. त्याने आपल्या कारकिर्दितील 18 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाच्या तिसरा फलंदाज ठरला आहे. 

भारताच्या 256 धावांचा पाठलाग करताना कांगारुंनी दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीच भारताचे हे आव्हान पार करुन विक्रम रचला. कांगारुंनी आपल्या डावाची सुरुवात केली त्यावेळी फिंचने आक्रमक पवित्रा घेतला होता. पण, 10 षटके झाल्यानंतर वॉर्नरनेही आपला गिअर बदलला. बघता बघता वॉर्नरने फिंचला मागे टाकत पहिल्यांदा अर्धशतक आणि शतक ठोकले. त्याचे हे एकदिवसीय कारकिर्दितील 18 वे शतक आहे. 

ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त तीन खेळाडूंनी इतकी शतके केली आहेत. यात रिकी पाँटिंग, मार्क वॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे. मार्क वॉ यांनी 18 एकदिवसीय शतके केली होती. वॉर्नरने त्यांची बरोबरी साधली. त्यामुळे वॉर्नरपुढे आता फक्त रिकी पाँटिंगची 29 शतके आहेत पण, हा टप्पा फार लांबचा आहे. दरम्यान, फिंचनेही एकदिवसीयमधील आपले 16 वे शतक ठोकले. त्यामुळे वॉर्नरला टक्कर देण्यासाठी फिंचही सज्ज आहे.