Tue, Sep 22, 2020 00:04होमपेज › Sports › पंधरा वर्षाच्या कोकोने व्हिनसनंतर ओसाकाची केली शिकार

पंधरा वर्षाच्या कोकोने व्हिनसनंतर ओसाकाची केली शिकार

Last Updated: Jan 24 2020 5:37PM
मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अमेरिकेच्या १५ वर्षाच्या कोको गौफने मोठ्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजने सुरुच ठेवले आहे. पहिल्या फेरीत ७ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या व्हिनस विलियम्सला सरळ सेटमध्ये पराभूत केले. आता तिने तिसऱ्या मानंकित आणि गतविजेती नोआमी ओसाकाचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. कोकोचा हा विजय गेल्या वर्षीच्या युएस ओपन स्पर्धेतील पराभवाचे उट्टे आहे असे मानले जात आहे. 

२२ वर्षीय नोआमी ओसाका ही महिला एकेरीतील एक नावाजलेली खेळाडू आहे. तिचा पराभव एका १५ वर्षाच्या बिगरमानांकित टेनिसूपटूने केला आहे. कोको गौफने तिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयानंतर कोकोने 'दोन वर्षापूर्वी मी ऑस्ट्रेलियन ओपन ज्यूनिअर स्तरावर पहिल्याच फेरीत हरले होते आणि आता मी इथे आहे हे अविश्वसनिय आहे. सामन्यादरम्यान मी स्वतःला सतत सांगत होते फक्त लढत रहा कारण कोर्टवर काय होईल हे तुम्हला माहित नसते.' 

कोकोने पहिल्यापासूनच सामन्यावर पकड ठेवली होतीय. तुलनेने अनुभवी असलेल्या ओसाका मात्र पहिल्यापासूनच झगडत होती. त्यामुळे कोकोने पहिला सेट ३२ व्या मिनिटालाच जिंकला. कोकोने ही लय दुसऱ्या सेटमध्येही कायम राखली. यामुळे दोन ग्रँडस्लॅम विजेती ओसाका हताश होत होती. या सामन्यावरुन टेनिसमधील जाणकार ही भविष्यातील महिला एकेरीतील एक राव्हलरी होण्याची शक्यता वर्तवत आहेत. 

कोकोने ऑफ सिजनमध्ये अव्वल टेनिसपटू सेरेना विलियम्सबरोबर प्रशिक्षण घेत होती. तिला याचा चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सेरेना विल्यम्सलाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या कियांग वांगने तिचा ४-६, ७-६(२), ५-७ असा पराभव केला. 

 "