Sat, Jan 18, 2020 11:56होमपेज › Sports › सानिया मिर्झाची बहिण विवाह बंधनात

सानिया मिर्झाची बहिण विवाह बंधनात

Last Updated: Dec 13 2019 1:43AM
हैदराबाद : वृत्तसंस्था 

टेनिसपटू सानिया मिर्झा हिची छोठी बहीण अनम आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दिन यांचा मुलगा असुद्दिन यांचा विवाह हैदराबादमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. अनमने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

या लग्न समारंभास क्रीडा, सिनेसृष्टीतील अनेक सेलेब्रेटीसोबत मोठे राजकीय नेतेही उपस्थित होते. या दोघांच्या लग्नाचा स्वागत समारंभही लवकरच होणार आहे. अनम ही फॅशन डिझायनर आहे. सानियाचे बहुतांश कपडे हे अनमनेच डिझाईन केलेेले असतात. तिला बर्‍याचदा सानियासोबत पाहण्यात येत असे. अझरुद्दिन यांचा मुलगा असुद्दिन हा क्रिकेटपटू म्हणून अपयशी ठरल्यानंतर आता बिझनेस करीत आहे.