Wed, Dec 11, 2019 19:27होमपेज › Soneri › जेव्हा दीपिकाला येते श्रीदेवीची आठवण...

जेव्हा दीपिकाला येते श्रीदेवीची आठवण...

Last Updated: Dec 03 2019 4:48PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आज या जगामध्ये नाहीत. परंतु, त्या नेहमी आपल्या अतुल्य काम आणि अनुभवासाठी नेहमी लक्षात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकताच श्रीदेवी यांची एका कार्यक्रमात आठवण काढली. 

दीपिका म्हणाली, 'मी खूप भाग्यवान आहे की, मला येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली. बोनी जी आणि श्रीदेवी मॅम या माझ्या पहिले चँम्पियन आहेत.'

दीपिकाने श्रीदेवी यांची भेट कशी आठवणीची ठरली, याबद्दल सांगितले. ती म्हणाली, '२००७ मध्ये ज्यावेळी मी माझे करिअर सुरू केले होते. त्यावेळी त्या माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजवर मला वैयक्तीकरित्या सकारात्मक मॅसेज पाठवायच्या.

माझ्याजवळ आजदेखील ते मॅसेज माझ्याकडे आहेत. श्रीदेवी मॅमशी माझे चांगले संबंध होते. कदाचित हे एक साऊथ इंडियन कनेक्शन होते. मी माझ्या जीवनात कुठलेही काम केले की त्या कामाला श्रीदेवी यांचे समर्थन मिळालेच म्हणून समजा. त्या माझ्या नेहमीच लक्षात राहतील.'

दीपिका पादुकोण लवकरच चित्रपट छपाकमध्ये दिसणार आहे. छपाक एका ॲसिड ॲटॅक पीडितेच्या भूमिकेत दिसणार आहे.