Tue, Jun 15, 2021 13:35
विक्‍की कौशलने कॅटरीनाला सलमानसमोर केलं होतं प्रपोज, अशी झाली लव्ह स्टोरीची सुरुवात

Last Updated: Jun 10 2021 4:42PM

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्‍की कौशल आणि कॅटरीना कैफ या बॉलिवूडच्या दोन लव्ह बर्ड्सवरून सध्या खूप चर्चा होत आहे. मागील वर्षी या दोघांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरीना कैफ सिंगलहुड एन्जॉय करत होती. विक्‍की कौशलसोबत तिची वाढती जवळीक पाहून फॅन्सना खूप उत्सुकता लागून राहिली होती की दाोघे एकमेकांचे होणार का? 
 'उरी: द सर्जिकल स्‍ट्राइक'च्या यशानंतर विक्‍की कौशलच्या स्‍टारडमचा आलेखदेखील गतीने वर गेला. विक्‍की अनेक वेळा कॅटरीनाशी तिच्या घरी लपून-छपून भेटण्यासाठी पोहोचला. परंतु, तो अखेर कॅमेराबध्द झाला. असो, हर्षवर्धन कपूरने आता ही पुष्‍ट‍ी केली आहे की, विक्‍की आणि कॅटरीना एकत्र आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, दोघांच्या  अफेयरची सुरुवात कशी झाली? विशेष म्हणजे, विक्‍की कौशल एकदा सलमान खानसमोरच कॅटरीनाला लग्नासाठी प्रपोज केले हाेते.

हर्षवर्धन कपूरने दोघांच्या नात्यावर केला शिक्कामोर्तब 

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. हर्षवर्धन कपूरला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, 'विकी कौशल-कॅटरीना कैफ एकत्र आहेत आणि हे खरं आहे.' हर्षवर्धन पुढे हेदेखील म्हणाला होता की, हा खुलासा त्याला महाग पडणार आहे. 

करण जोहरने घडवून आणली होती भेट 

विक्‍की - कॅटरीनाच्या नात्यासाठी करण जोहरचा मोठा हात आहे. विक्‍की - कॅट दोघे करणच्या पार्टीमध्ये अनेकदा एकत्र दिसले आहेत. विक्‍की आणि कॅटरीना दोघांच्या नात्याची सुरुवात कररण जोहरच्या शोमध्ये झाली होती. २०१८ मध्ये करण जोहरचा टीव्ही शो 'कॉफी विथ करण'मध्ये कॅटरीना कैफ आली होती. तेव्हा करणने आपल्या मजेशीर अंदाजात तिला विचारलं होतं की, तिच्यासोबत कोणत्या अभिनेत्याची जोड़ी चांगली वाटेल. यावर कॅटने विक्की कौशलचं नाव घेतलं होतं. यानंतर करणच्या शोमध्ये विक्‍की कौशल आणि आयुष्‍मान खुराना उपस्थित होते. तेव्हा करण जोहरने विक्‍कीला कॅटविषयी सांगितलं. 

एका वर्षानंतर घट्ट झाली मैत्री 

विक्‍की कौशल बॉलिवूडमधील ॲक्‍शन डायरेक्‍टर शाम कौशलचा मुलगा आहे. 'मसान' आणि 'रमन राघव 2.0' यांसारख्या चित्रपटातून विक्‍कीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. 'उरी'तून तो स्टार झाला. करण जोहरच्या शोच्या एक वर्षांनतर २०१९ मध्ये विक्‍की-कॅटरीनामध्ये जवळीकता वाढली. 

विक्‍कीने जेव्हा कॅटला प्रपोज केलं? 

२०१९ च्या एका पुरस्कार सोहळ्यात कॅटने पुरस्कार जिंकला आणि ती व्यासपीठावर ट्रॉफी घेण्यासाठी पोहोचली. विक्की कौशल सूत्रसंचालन करत होता. तो कॅटरीनाला म्हणाला, 'तू कोणत्या तरी चांगल्या विक्‍की कौशलला शोधून लग्न का करत नाही?' यावर कॅटरीना कैफ हसू लागली. 

सलमानसमोर केलं प्रपोज

विक्की कौशलने कॅटला पुढे सांगितले की, 'लग्नाचे सीझन सुरू आहे, मला वाटलं की, तुम्हालाही विचारावं.' यावर कॅटरीना म्हणाली-काय? उत्तरात विक्कीने लाजत म्हणाला, 'माझ्याशी लग्न करशील?' कॅट म्हणाली, 'हिंमत नाही.' असो, व्यासपीठावर विक्‍की कौशल आणि कॅटचे मजेशीर अंदाजात प्रश्न-उत्तरे सुरू होता. पण, पुढे जाऊन दोघे रिलेशनशीपमध्ये येतील, त्यावेळीचं काही लोकांना याचा अंदाज आला होता. 

 

video -bigbollywoodpage insta वरून साभार