Thu, May 28, 2020 13:13होमपेज › Soneri › #Valentinesday 'या' जोड्यांनी केलं व्हॅलेंटाईन डेला लग्न!

'या' जोड्यांनी केलं व्हॅलेंटाईन डेला लग्न!

Last Updated: Feb 14 2020 2:32PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

व्हॅलेंडाईन डे प्रेमाचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी कदाचित यापेक्षा दुसरा खास दिवस असूच शकत नाही. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आज काही आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील. बॉलिवूड आणि टीव्हीतील अशा काही कलाकारांच्याबद्दल जाणून घेऊया, ज्यांची लग्नानंतर खूप चर्चा रंगली. 

टीवी अभिनेता राम कपूर आणि गौतमीने व्हॅलेंटाईन्स डेलाच लग्न केले होते. दोघांचे लग्न १४ फेब्रुवारी, २००३ रोजी झाले होते. दोघांनी सोशल साईट्सवर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त केले होते. 

Image result for ram kapoor and goutami

टीव्ही  मालिका 'कहता है दिल जी ले जरा' फेम रुसलान मुमताज आणि निराली मेहताची क्यूट जोडी कोण विसरू शकेल. रुसलान आणि निराली यांनी १४ फेब्रुवारी, २०१४ ला कोर्ट मॅरेज केले होते. कोर्ट मॅरेजनंतर दोघांनी २ मार्च २०१४ रोजी गुजराती रीती-रिवाजाने लग्न केले होते. 

Image result for Ruslaan Mumtaz and her wife Nirali Mehta

बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने मारिया गोरेट्टीशी १४ फेब्रुवारी, १९९९ रोजी लग्न केले होते. दोघांची पहिली भेट १९९१ मध्ये झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांनी ८ वर्षे डेटिंग केले. त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले. 

Image result for arshad warsi and wife maria marriage

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने रिया पिल्लईशी १९९८ मध्ये मुंबईतील एका मंदिरात लग्न केले होते. संजयने व्हॅलेंटाईन डेच्या औचित्याने लग्न केले होते. हा संजय दत्तचा दुसरा विवाह होता. परंतु, दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. २००८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 

Image result for sanjay dutt and wife pillai

टीव्ही अभिनेत्री मंदिरा बेदी आपल्या फिटनेसबद्दल नेहमीच चर्चेत असते. मंदिरा तिचा पती राज कौशलसोबत फोटोज नेहमी शेअर करत असते. मंदिरा आणि राजने १४ फेब्रुवारी, १९९९ मध्ये लग्न केले होते. 

Image result for mandira bedi and raj kaushal