Wed, Jan 20, 2021 09:29होमपेज › Soneri › 'तराट' चित्रपटाचा हटके फर्स्ट लूक

'तराट' चित्रपटाचा हटके फर्स्ट लूक

Last Updated: Oct 09 2019 5:20PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

नवनवीन कथाविषयांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हटके कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी या दोन गोष्टींच्या जोरावर आपलं वेगळंपण सिद्ध करणारा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच येऊ घातलाय. 'तराट' नावाप्रमाणेच वेगळेपण जपणारा हा मराठी चित्रपट रवी वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी दिग्दर्शित केला आहे. 

वृंदावन एन्टरटेनमेन्ट अँड फिल्म्स निर्मित 'तराट'ची कथा रंगीलगावामध्ये घडते. पाच मित्रांच्या उनाडक्यांच्या अनुषंगानं खुलणारा 'तराट' हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या तरुण वयातील खोडसाळ आठवणींना उजाळा देईल असा आहे. 

'तराट' चित्रपटाची कथा व  पटकथा आणि संवाद - रवी वाव्होळे  आणि सागर भंडारे यांनी लिहिलेली असून चित्रपटाच्या पोस्टरद्वारा मराठी चित्रपटसृष्टीत 'तराट' हा आगामी मराठी चित्रपट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.