Thu, Jul 02, 2020 20:29होमपेज › Soneri › ए आर रहमानच्या मुलीच्या बुरख्यावरुन कोण बोलले?

ए आर रहमानच्या मुलीच्या बुरख्यावरुन कोण बोलले?

Last Updated: Feb 13 2020 6:37PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

लोकप्रिय गायक ए. आर. रहमान यांच्या मुलीने बुरखा घातल्यानंतर अनेकवेळा ट्रोल करण्यात आले. आता प्रसिध्द लेखिका तस्लीमा नसरीन यांनी रहमान यांच्या मुलीने एका कार्यक्रमात बुरखा घातल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ए. आर. रहमान यांच्या मुलीवर निशाणा साधला. 

तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे-'मला ए आर रहमान यांचे संगीत खूप आवडते. परंतु, मी जेव्हा त्यांच्या मुलीला पाहते, तेव्हा मला गुदमरल्यासारखे फील होते. हे खूपच निराशाजनक आहे की, कल्चरल फॅमिलीतील एका शिकलेल्या-सुशिक्षित महिलेचे सहजपणे ब्रेनवॉश होऊ शकते.'

तस्लीमा यांनी ए. आर. रहमान यांच्या मुलीचा जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवरून पूर्वीदेखील रहमान ट्रोल झाले आहेत. 

रहमान यांनी सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला होता. फोटो ट्विट करते त्यांनी कॅप्शन लिहिले होते - 'नीता अंबानी यांच्यासोबत माझी फॅमिलीतील महत्तवपूर्ण महिला-खातिजा, रहीमा आणि सायरा. #freedomtochoose'. 

तस्लीमा नसरीन यांनी याच फोटोतील ए आर रहमान यांच्या मुलीचा फोटो क्रॉप करून शेअर केला आहे. 

चित्रपट स्लमडॉग मिलिनियरच्या संगीताला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने रहमान यांची मुलगी खातीजा पोहोचली होती. येथे ती खूपच भावूकदेखील झाली होती. कार्यक्रमामध्ये खातीजा बुरखा घालून गेली होती. 

बुरखा घालण्याविषयी खातिजा म्हणाली होती की, 'मला बुरखा घालण्यासाठी घरच्यांनी कधी दबाव आणला नाही. मी जर बुरखा घालते तर ही माझ्या पसंतीने घालते. मी अडल्ट आहे. मला माहित आहे काय घालायचे आणि काय नाही.'