Wed, Feb 19, 2020 13:22होमपेज › Soneri › सुष्मिताचे रोहमनसोबत रोमॅंटिक डेटिंग

सुष्मिताचे रोहमनसोबत रोमॅंटिक डेटिंग

Last Updated: Feb 14 2020 12:22PM

सुष्मिता सेन आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या फिटनेस आणि लव्ह लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. गेल्या दोन वर्षांपासून सुष्मिता आपल्या पेक्षा १५ वर्षानी लहान असणाऱ्या बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुष्मिता आणि रोहमन या जोडीने सोशल मीडियावर आपले  प्रेम व्यक्त केले आहे. तर दोघांचीही लव्ह स्टोरी कुणापासून ही लपलेली नाही.

वाचा : मोहब्बत है क्या चीज....

'व्हॅलेंटाईन डे' १४ फेब्रुवारीला अनेक प्रेमवीर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या निमित्ताने सुष्मिता सेन, बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या दोन मुलीसोबत रात्री व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सुष्मिताने यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सुष्मिता आणि रोहमन खूप रोमँटिक दिसत आहेत. यानंतर रात्री उशीरा त्यांनी एक केक कापला. याशिवाय त्याच्या घराची सुंदर सजावट लाइटोने केली होती. सुष्मिताने या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली आहे की, 'मी तुमच्या प्रेमाचे कौतुक करते त्याने इतका संयम दाखविला. 

वाचा : ए आर रहमानच्या मुलीच्या बुरख्यावरुन कोण बोलले?

सुष्मिता गेली १० वर्ष कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. शेवटची ती 'नो प्रॉब्लम' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सुष्मितासोबत अनिल कपूर, संजय दत्त, कंगना राणावत, अक्षय खन्ना आणि शक्ती कपूर यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. याशिवाय सुष्मिता 'बीवी नं १’, ‘जोर’, ‘फिलहाल’, ‘मैं हूं न’आणि ‘मैंने प्यार क्यों किया’ या चित्रपटात काम केले होते. 

(photo : sushmitasen47 instagram वरून साभार)