नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. सोनम कपूरच्या मेकअप सेन्स आणि ड्रेसिंग स्टाईलने नेहमीच सर्व चाहते भारावून जातात. सध्या सोनमने आणखी एकदा आपल्या अदाकाराने चाहत्यांना भारावून सोडले आहे.
सध्या सोनमने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सोनम रॉयल लूकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. सोनमने या फोटोत गोल्डन मेटल क्रॉप टॉप घातला आहे. सोनमचा हा फोटा एका सुंदर झाडाशेजारी असल्याचे दिसून येत आहे. या फोटोत सोनमने आपले केस मोकळे सोडून पोज दिली आहे.
वाचा : सर्किटची 'त्यामुळे' सटकली! म्हणाला आता माझी पेंटिंग विकत घ्या, त्यानंतर किडनीचा नंबर आहे
याआधीही सोनमने अनेक वेळा फोटोशूट केलेले आहे. तसेच सोनमने काही दिवसांपूर्वी आपल्या घराचे काही फोटो शेअर केले होते. यावेळी सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजाही दिसले होते. या फोटोत सोनमने घराच्या अभ्यासाच्या खोलीतून लॉन, वर्क स्टेशन, किचन, बेडरूम दाखविला होता. तसेच सोनम कपूर स्वत: एका फोटोत स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना दिसली होती.
वाचा : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनया' घेणार 'एक्झिट'?
सोनम कपूर आज बॉलिवूडमध्ये एका मोठ्या शिखरावर पोहोचली आहे. तिचे २९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
(photo : sonamkapoor instagram वरून साभार)