मुंबई : पुढारी ऑनलाईन
जगासह भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील झाला आहे. देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले असताना विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी देखील मदतीचा हात पुढे करत आहेत. यात बॉलिवूड सेलब्स देखील मागे नाहीत. बॉलिवूड सेलेब्स देखील आपआपल्या परीने कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यास मदत करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटीची मदत जाहीर केली. यानंतर मात्र ज्या बॉलिवूडकरांनी आतापर्यंत मदतीचा हात पुढे केलेला नाही त्यांच्यावर मात्र सोशल मीडियावर जोरदार टीकास्त्र सुरु आहे.
यामध्ये पहिल्या नंबरवर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे नाव येते. कारण बॉलिवूड किंग शाहरुख खानने आतापर्यंत कसलीच मदत जाहीर केलेली नाही. यामुळेच नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. मात्र शाहरुखचे चाहते मात्र त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. अशा परस्थितीत काल ट्विटरवर #StopNegativityAgainstSRK ट्रेंड जोरदार तेजीत होता.
शाहरुख खानचे चाहते त्याच्या मदतीला धावून आले आहेत. यापूर्वी केलेल्या मदतीची माहिती सोशल मीडियाच्या आधारे शेअर करत आहेत. मात्र शाहरुख खानने मात्र आतापर्यंत यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शाहरुखची प्रतिक्रिया यावर काय असणार तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीला शाहरुख धावणार का? असा प्रश्न सध्या नेटकर्यांना सतावत आहे.
या कलाकारांना मोठ्या मनाने केली मदत
देश संकटात असताना अनेक कलाकारांनी आर्थिक मदत देवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. यामध्ये तेलुगू सुपरस्टार्स पवन कल्याण, राम चरण, 'बाहुबली' फेम प्रभास, महेश बाबू, चिंरजीवी, जूनियर एनटीआर, रजनीकांत अर्जुन अल्लू यासारख्या दाक्षिणात्या कलाकारांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. बॉलिवूड कलाकारांपैकी अक्षय कुमार, वरुण धवन, भूषण कुमार, रणदीप हुड्डा, कपिल शर्मा या कलाकारांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
►इस्लामपूर येथे लहान मुलास कोरोना
►कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण