Mon, Aug 03, 2020 15:00होमपेज › Soneri › सलमानच्या नव्या चित्रपटाच्या कथेचा खुलासा

सलमानच्या नव्या चित्रपटाच्या कथेचा खुलासा

Last Updated: Jan 15 2020 5:15PM
हिंदू-मुस्लिम एकता दाखवणार सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली'  

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मागील दिवसांमध्ये सलमान खानने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. २०२१ मध्ये ईदच्या निमित्ताने त्याचा कभी ईद कभी दिवाली हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या कहाणीचा खुलासा झाला आहे.  या चित्रपटाची कहाणी मजेशीर आहे. कभी ईद कभी दिवालीची कथा काय असणार आहे, हे समोर आले आहे. 

काय आहे कभी ईद कभी दिवालीचा प्लॉट?

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या कभी ईद कभी दिवालीची स्टोरीलाईन समोर आली आहे. सलमान खानच्या चित्रपटात हिंदू-मुस्लिम एकता दाखवण्यात आली आहे. सलमानचा चित्रपट सद्भावना आणि शांतीचा संदेश देणारा असेल. 

या चित्रपटाची कहाणी सलमान खानची स्वत:च्या फॅमिलीशी संबंधित आहे. सलमानचे वडील मुस्लिम आहेत, आई हिंदू आहे. सावत्र आई हेलेन कॅथॉलिक आहे. चित्रपटाचा प्लॉट यासारखाच असेल. एक असे कुटूंब ज्यांच्या आयुष्यातील चढ- उताराची कहाणी दाखवली जाईल आणि ईद-दिवाळीही उत्साहाने साजरा करणाऱ्या कुटुंबाची कहाणी दाखवली जाईल. 

सलमान खान स्टारर चित्रपट कभी ईद कभी दिवाली फरहाद समजी दिग्दर्शित करत आहेत. साजिद नाडियाडवाला यांची कहाणी असून निर्मितीही त्यांचीच आहे.