Tue, Sep 22, 2020 10:23होमपेज › Soneri › 'दिल बेचारा'च्या ट्रेलरनंतर सैफ अली खान चर्चेत  

'दिल बेचारा'च्या ट्रेलरनंतर सैफ अली खान चर्चेत  

Last Updated: Jul 15 2020 12:24PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'दिल बेचारा' सध्या चर्चेत आहे. 'दिल बेचारा' हा सुशांतचा अखेरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाचा ट्रेलर भावूक करणारा आहे. परंतु, ट्रेलर आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. 

खरंतर, सैफ अली खानदेखील 'दिल बेचारा' चित्रपटाचा एक भाग आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सैफची दृश्ये दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे या ट्रेलरची चर्चा होत आहे. याबद्दल सैफ अली खानची कोणतीही तक्रार नाही. त्याचबरोबर, ट्रेलरविषयी त्याने कोणताही आक्षेप घेतलेला नाही. एका बॉलिवूड वेबसाईटनुसार, सैफ अली खानने आपली भूमिका ट्रेलरमध्ये दिसली नाही म्हणून कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. 

सैफ अली खानचे म्हणणे आहे, 'माझी एक कॅमियो भूमिका आहे. मी खुश आहे. मी ट्रेलरमध्ये दिसलो नाही.' रिपोर्ट्सनुसार, निर्मात्याकडून सैफ अली खानच्या भूमिकेविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाचे शूटिंग पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. सैफ अली खानचे काही सीन्स पॅरिसमध्येदेखील शूट केले गेले आहे. याआधी 'दिल बेचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही एक आठवड्यासाठी पॅरिसमध्ये शूटिंग केले. सैफ काही दिवसांसाठी तेथे होता. 

अधिक वाचा-सुशांतच्या आठवणींनी कृती झाली भावूक

'दिल बेचारा'मध्ये सुशांत सिंह राजपूत संजना सांघीसोबत दिसणार आहे. 'दिल बेचारा' २४ जुलैला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 "