Fri, Sep 18, 2020 22:14होमपेज › Soneri › श्रीदेवीच्या नकारानंतर राम्याला मिळाली 'शिवगामी'ची भूमिका 

श्रीदेवीच्या नकारानंतर राम्याला मिळाली 'शिवगामी'ची भूमिका 

Last Updated: Sep 15 2020 1:02PM
वाढदिवस विशेष

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चित्रपट 'बाहुबली'तील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. महेंद्र बाहुबली असो वा कटप्पा, शिवगामी असो वा देवसेना...सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका जिवंत साकारण्यासाठी मेहनत घेतली आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यातदेखील सिनेरसिक त्यांना भूमिकेतील नावाने ओळखतात. अशीच एक भूमिका होती -राजमाता शिवगामीची. शिवगामी अर्थातच अभिनेत्री राम्या कृष्णन. राम्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या वाढदिवसाच्या औचित्याने काही खास गोष्टी जाणून घेऊयात. 

dinsta

राम्या कृष्णनचा जन्म १५ सप्टेंबर, १९७० रोजी चेन्नईत झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी राम्याने तमिळ चित्रपट 'वेल्लई मनासू' (१९८४) मधून डेब्यू केलं होतं.

राम्याने दाक्षिणात्य चित्रपटांनतर बॉलिवूडकडे पाऊल वळवले. १९९३ मध्ये तिने यश चोप्रा यांचा चित्रपट 'परंपरा'तून हिंदी सिनेमा जगतात मुख्य अभिनेत्री म्हणून एन्ट्री केली. 

dinsta

आपल्या चित्रपट करिअरमध्ये राम्याने अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबत काम केले आहे. राम्याने अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, नाना पाटेकर आणि शाहरुख खान यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 

१९९८ मध्ये आलेला डेविड धवनचा चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये राम्या अमिताभ बच्चन आणि गोविंदासोबत दिसली होती. यावर्षी राम्याचा आणखी एक चित्रपट 'वजूद' रिलीज झाला. यामध्ये नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि राम्याच्या किसिंग सीनने धुमाकूळ घातला होता. राम्याने आपल्यापेक्षा मोठ्या स्टारसोबत किसिंग सीन दिले होते. पुढे सुभाष घई यांचा 'खलनायक', महेश भट्ट यांचा 'चाहत' आणि डेविड धवन यांच्या 'बनारसी बाबू'मध्ये अभिनय केला. राम्याने शाहरुखसोबत 'चाहत'मध्ये रोमान्स केला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि पूजा भट्टची भूमिका होती. या चित्रपटामधील गाणे 'दिल की तनहाई' सुपरहिट झाले होते. चित्रपटातील राम्याची भूमिकाही सर्वांच्या पसंतीस उतरली होती. 

dinsta

बाहुबली : राम्यासाठी मैलाचा दगड 

चित्रपट 'बाहुबली' राम्यासाठी मैलाचा दगड ठरला. खूप कमी लोकांना माहिती असेल की, शिवगामीच्या भूमिकेसाठी राम्याला ऑफर करण्याआधी श्रीदेवीला विचारण्यात आले होते. परंतु, अधिक मानधन मागितल्याने दिग्दर्शक राजामौली यांनी राम्याला साइन केले. रिपोर्टनुसार, श्रीदेवीने या भूमिकेसाठी ६ कोटी रुपये मागितले होते. 

dinsta

राम्याची अशी आहे लाईफस्टाईल

राम्याकडे मर्सिडीज बेंज एस३५० सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. राम्या सध्या आपल्या परिवारासोबत चेन्नईतील इंजमबक्कममध्ये राहते. येथे तिचा बंगला आहे. २०१२ मध्ये राम्याच्या मेडने जवळपास १० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. 

राम्या तमिळ भाषेतील चित्रपट 'सुपर डीलक्स'मध्ये दिसली होती. चित्रपटामध्ये राम्याने एका पॉर्नस्टारची भूमिका साकारली होती. त्यागराजन कुमारराजाने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, कुमारराजामुळे राम्याला एका खास सीनसाठी २ दिवसांत ३७ वेळा रिटेक घ्यावे लागले होते. 

२००३ मध्ये राम्याने तेलुगु फिल्ममेकर कृष्णा वामसीशी विवाह केला. त्यांना एक मुलगा ऋत्विक आहे. 

dinsta

(photo- queenramyakrishnan insta वरून साभार)

 "