Thu, May 28, 2020 18:15होमपेज › Soneri › 'आशिकी बॉय'चे कमबॅक!  

'आशिकी बॉय'चे कमबॅक!  

Last Updated: Dec 02 2019 5:46PM

राहुल रॉयमुंबई : पुढारी ऑनलाईन

१०९०च्या दशकात ब्लॉकबस्टर 'आशिकी' या चित्रपटाचे धूमाकूळ घातला होता. या चित्रपटातून रातोरात राहुल रॉय स्टार बनला. या चित्रपटानंतर राहुलचे चाहत्यामध्ये भरपूर कौतुक झाले. याशिवाय राहुलला महिला चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय मिळाली. सलमानच्या शो 'दस का दम' मध्ये करिना कपूरने एकदा सांगितले होते की, तिला सलमानपेक्षा राहुल रॉय जास्त आवडतात आणि त्याचे पोस्टर्स घराच्या खोलीत लावली आहेत.  

'आशिकी' हिट झाल्यानंतर राहुलने ४७ चित्रपट साईन केले होते. त्यातील १९ जणांचे पैसे परत केले होते. याशिवाय राहुलचे त्यावेळी २३ चित्रपट टॉप लेवलला पोहोचले होते. राहुल एका दिवसात ३ चित्रपटांचे शूटिंग करून रात्रीच्या वेळी एका चित्रपटाच्या शूटिंगचे काम करायचे. अशाप्रकारे स्ट्रगल सहा महिने सुरू होते, पंरतु यातील एकही चित्रपट हिट झाला नाही. राहुल रॉय हेअरस्टाईल आणि खास ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध होते. बरेच लोक त्याच्या लूकवर टीका देखील करीत होते. इंडस्ट्रीतले काही लोक म्हणायचे की, 'तो कधीही हिरो बनू शकत नाही. वयस्कर व्यक्तीसारखे कपडे घालतो आणि केस वाढवतो.' 

राहुलने कधी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. राहुल एका बिझनेसमॅन कुटूंबातील आहे. राहुलची आई लेख लिहायची. एकदा त्यांचा लेख वाचल्यानंतर महेश भट्ट त्यांना भेटायला घरी गेले. घरी राहुलचे फोटो पाहून भट्ट यांनी राहुलविषयी विचारले, त्यावेळी तो घरी नव्हता. यानंतर राहुलने महेश भट्ट यांना बोलावून घेतले आणि त्यांची निवड 'आशिकी' या चित्रपटासाठी झाली.

खास गोष्ट अशी की, २७ वर्षांनंतर राहुलने काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन चित्रपटासाठी त्याच्या केसांचा लुक बदलला आहे. परंतु या चित्रपटाबद्दलची कोणतीच माहिती मिळालेली नाही. राहुल रॉय बर्‍याच काळापासून इंडस्ट्रीलासून दुर होते. राहुलने 'फिर तेरी याद आई', 'जानम', 'सपने साजन के', 'गुमराह' आणि 'मजदार' यासारखे चित्रपट केले. राहुलने आपल्या कारकीर्दीत एकूण २५ हिंदी चित्रपट केले. पण यापैकी एक ही चित्रपट हिट झाला नाही. त्यातील काही चित्रपट महेश भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली बनले होते. चित्रपट फ्लॉप झाल्यावर राहुलने महेश भट्ट यांना कधीच विसरले नाहीत. तो सतत त्यांच्याशी एकजूड राहिले. 

याशिवाय राहुलने अनेक भोजपुरी चित्रपटांतही काम केले. इतकेच नाही तर राहुलला इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी बी आणि सी दर्जाचे चित्रपट करण्यास भाग पाडले. पहिल्या चित्रपटानंतर राहुलच्या कारकीर्दीला जणू ग्रहण लागले. राहुलने मॉडेल राजलक्ष्मी खानविलकरशी लग्न केले. काही वर्षांपूर्वी त्याने 'बिग बॉस रिअॅलिटी शो'मध्ये भाग घेतला होता जेथे तो सीझन १चा विजेता बनला होता. यानंतर त्याच्या करिअरवर फारसा परिणाम झाला नाही.