Mon, Jul 06, 2020 04:57होमपेज › Soneri › राधिका आपटेला अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर्स

राधिका आपटेला अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर्स

Last Updated: Dec 03 2019 2:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बदलापूर चित्रपटाच्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला सेक्स कॉमेडी चित्रपटांचे ऑफर मिळाले होते. हा खुलासा खुद्द राधिका आपटेने केला आहे. तिने बरखा दत्तचा शो वी द वुमेनमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने आपल्या करिअरमध्ये घडलेल्या प्रसंगांचा उल्लेख केला. त्याचबरोबर, चित्रपट प्रवास आणि खासगी आयुष्याविषयी सांगितले.   

राधिका आपटे बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने चित्रपटांमध्ये न्यूड आणि बोल्ड सीन दिले आहेत. बदलापूर चित्रपटाच्या दरम्यान न्यूड व्हिडिओमुळेही ती चर्चेत राहिली होती. 

राधिकाने आपल्याविषयी अनेक खुलासे केले. राधिकाने बदलापूर दरम्यानचा आपला न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्याचा उल्लेख करत म्हणाली, बदलापूरनंतर अनेक सेक्स कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या होत्या. 

ती म्हणाली- 'तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ज्यावेळी मी बदलापूर चित्रपट करत होते, त्यावेळी सीनमध्ये एका व्यक्तीला माझा रेप करून मला मारायचे असते. या सीननंतर मला सेक्स कॉमेडी चित्रपटांचे ऑफर येऊ लागले. यामागचे कारण, माझी शॉर्ट फिल्म अहल्या होती, यामध्ये मी न्यूड सीन दिले होते. यानंतर, लोक मला त्या प्रकारच्या भूमिका ऑफर करू लागले. मी लोकांना विचारलं की, आपण मला सांगू शकता की, आपण माझ्या भूमिका कोठे पाहिल्या? ते म्हणाले- 'अहल्या', 'बदलापूर'. मी म्हणाले-खूप मोठी समस्या आहे. मी अशा गोष्टी करत नाही.' 

राधिका आपटेने अनेक चित्रपटांमध्ये न्यूड सीन दिले आहेत. तिने बरखा दत्तच्या शोमध्ये आपला फिल्मी प्रवास उलगडला. ती म्हणाली की, मी खूप सारे चित्रपट रिजेक्ट केले आहेत. 

राधिकाने 'स्लीपवॉकर्स' नावाची एक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनदेखील केले आहे. ही  शॉर्ट फिल्म ३० मिनिटांची आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपले असून हनी त्रेहान, अभिषेक चौबे आणि ललित प्रेम शर्मा प्रोड्यूस करत आहेत. तर गुलशन देवैया आणि शहाना गोस्वामी यांची मुख्य भूमिका आहे. राधिकाने अनेक  शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. आशीष अविकुन्तकचा चित्रपट 'दरमियान', अनुराग कश्यपचा इव टीजिंग, देट डे आफ्टर एवरीडे आणि सुजॉय घोषचा बंगाली चित्रपट 'अहल्या' या  शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे.