अली फैजल- अमायराची 'प्रस्थानम'च्या गाण्यात केमिस्ट्री (video)      

Published On: Sep 10 2019 7:11PM | Last Updated: Sep 10 2019 7:11PM
Responsive image
अली फैजल आणि अमायरा दस्तूर


मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता अली फैजल आणि अमायरा दस्तूर यांचा आगामी 'प्रस्थानम' हा चित्रपट लवकरच येत आहे. तर सध्या या चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले आहे. 

या गाण्यात अली फैजल आणि अमायराची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या गाण्याचे बोल 'दिल दारिया' असे आहे. या गाण्याला २८ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.  

'प्रस्थानम' या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा काट्टा यांनी केले आहे.  हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात संजय दत्त, जॉकी श्रॉफ, अली फैजल आणि मनीषा कोइराला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जॉकी श्रॉफसोबत चंकी पांडे आणि अमायरा दस्तूर हेही या चित्रपटात दिसणार आहेत. 'प्रस्थानम' २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

याआधी या चित्रपटातील जॉकी श्रॉफचा शाही गार्डच्या वेशातील एक फोटो व्हायरल झाला होता. याशिवाय या चित्रपटामधील अली फैजलचे पहिले पोस्टर आणि टिझर रिलीज झाले होता.   

(video : Zee Music Company youtube वरून साभार)