Wed, Aug 12, 2020 20:16होमपेज › Soneri › लॉकडाऊन होताच 'या' अभिनेत्रीने काढला पळ, पिशवीभरून आणलं साहित्य

लॉकडाऊन होताच 'या' अभिनेत्रीने काढला पळ

Last Updated: Mar 25 2020 4:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून काल मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली. याआधी त्यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. संपूर्ण देशात २१ दिवसांपर्यंत लॉकडाउन करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर, घरातून बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोदी यांच्या या निर्णयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांची लाईन लागली. 

एका अभिनेत्रीने तर लॉकडाऊनची घोषणा ऐकताच मोदी यांचे अर्धे भाषण ऐकून बाजारात गेली. ती अभिनेत्री आहे पायल रोहतगी. पीएम मोदी यांच्या भाषणात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा ऐकताच बाजारात गेली आणि २१ दिवसांचे साहित्य पिशवीतून भरून आणलं. ही माहिती खुद्द पायलने ट्विटरवर सांगितली. नंतर तिला समजलं की, जीवनाश्यक वस्तू उपलब्ध राहणार आहे. शिवाय, दुकानेही उपलब्ध राहणार आहेत. 

बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनुराग कश्यपने देखील म्हटले आहे, ‘रात्री ८ वाजण्याच्याऐवजी सकाळी ८ वाजता बोलला असता तर काहीतरी व्यवस्था केली असती. नेहमी आठ वाजता बोलतात आणि वेळ देतात चार तासांचा. परंत, त्यांचं काय? जे चालत आपल्या घरी चालले आहेत, शहर सोडून. कारण बस वा ट्रेन सुरू नाही. आता काय म्हणावं. ठीक आहे प्रभू.’