Fri, Sep 25, 2020 16:17होमपेज › Soneri › पानिपत : अर्जुन कपूरच्या भूमिकेवर भडकले युजर्स

पानिपत : अर्जुन कपूरच्या भूमिकेवर भडकले युजर्स

Last Updated: Nov 08 2019 4:29PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये सध्या पीरियड चित्रपटांची चलती आहे. आशुतोष गोवारिकर यांचा बिग बजेट असणाऱ्या 'पानीपत' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरवरून सोशल मीडियावर युजर्सकडून प्रतिक्रियाही येत आहेत. या चित्रपटात संजय दत्त, कृती सेनॉन, अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. आशुतोष गोवारिकर यांच्या कामाचेही कौतुक होत आहे. या दरम्यान, युजर्स अर्जुन कपूरला ट्रोल करत आहेत. 'पानीपत'चे ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. परंतु, या चित्रपटातील अर्जुनच्या भूमिकेवरून युजर्स सोशल मीडियावरून प्रतिक्रीया येत आहेत. 

पानिपत हा 'बाजीराव मस्तानी'ची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. तर कोणी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पीरियड चित्रपट म्हणत आहे. संजय दत्तला 'विलेन का बाप' असे म्हटले जात आहे. कृती सेनॉनला स्ट्रॉन्ग आणि क्यूट म्हटले जात आहे. तर काहींना 'पानीपत'च्या ट्रेलरमधील अर्जुन कपूरची भूमिका आवडलेली नाही.

Image result for panipat movie arjun kapoor

अर्जुन कपूरमध्ये 'वो बात नही'

एका युजरने लिहिले आहे 'प्रतीक्षित असणारा पानिपतचा ट्रेलर रिलीज झाल्य़ानंतर मला अर्जुन कपूरने निराश केलं. एका योद्ध्यासारखी आक्रमकता आणि भाव त्याच्यामध्ये नाही. तो एक ऐतिहासिक योद्धा वाटत नाही. कास्टिंग खूपच खराब वाटली'. 

आणखी एका युजरने लिहिले आहे-अर्जुन कपूरला या चित्रपटात घेऊन आशुतोष गोवारिकर यांनी चित्रपट खराब केला. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, अर्जुन प्रत्येक चित्रपटात एकसारखेच एक्सप्रेशन देतो. 

ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर-क्रिती सेनॉन यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यात मोहनीश बहल यांची मुख्य भूमिका तर संजय दत्त खलनायक म्हणून पाहायला मिळतोय. ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. मराठी संवादही क्रिती चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका साकारत असून ती मराठी बोलताना दिसत आहे. अर्जून कपूर सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत दिसत आहे. तर संजय दत्त अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. 

हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या व अखेरच्या लढाईवर आधारीत आहे. ही लढाई १४ जानेवारी, १७६१ रोजी अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी झाली होती. 

 "